Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Sanjay Raymulkar :संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांना यश; २५ कोटींच्या तीन पुलांची बहुप्रतिक्षित कामे सुरू

Sanjay Raymulkar : माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या २५ कोटी २१ लाख रुपयांच्या बोरी, अंत्री देशमुख व दुधा ब्रह्मपुरी येथील महत्त्वाच्या मोठ्या पुलांच्या बहुप्रतिक्षित बांधकामास अखेर सुरुवात झाली असून, त्या अनुषंगाने पर्यायी रस्ते तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे.

Sanjay Raymulkar

बोरी, अंत्री देशमुख व दुधा ब्रह्मपुरी येथील पूल बांधकामाला प्रारंभ; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश

मेहकर : माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या २५ कोटी २१ लाख रुपयांच्या बोरी, अंत्री देशमुख व दुधा ब्रह्मपुरी येथील महत्त्वाच्या मोठ्या पुलांच्या बहुप्रतिक्षित बांधकामास अखेर सुरुवात झाली असून, त्या अनुषंगाने पर्यायी रस्ते तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पैनगंगा नदीवरील बोरी येथील १० कोटी ९८ लाख रुपयांच्या मोठ्या पुलास, तसेच अंत्री देशमुख येथील पुलासाठी ८ कोटी २३ लाख रुपये आणि दुधा ब्रह्मपुरी येथील पैनगंगेवरील पुलासाठी ६ कोटी रुपये असा एकूण २५ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता.

पैनगंगा नदीला पावसाळ्यात मोठे पूर येत असल्याने या तिन्ही ठिकाणी असलेल्या जुन्या पुलांवरून पाणी वाहत असे. परिणामी परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनुसार या तिन्ही ठिकाणी मोठ्या पुलांची आवश्यकता लक्षात घेऊन रायमुलकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत निधी मंजूर करून घेतला.मात्र, पावसाळा व अतिवृष्टीमुळे तसेच पैनगंगा नदीवरील पेनटाकळी व कोराडी सिंचन प्रकल्पांतून सतत पाणी सोडावे लागत असल्याने, निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊ शकले नव्हते.

सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका आदी पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत आहे. पूल बांधकाम सुरू करता यावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिंचन विभागास सात वेळा पत्रव्यवहार केला होता. यानंतर कंत्राटदार व अधिकाऱ्यांशी चर्चा करून संजय रायमुलकर यांनी नदीपात्रात सिमेंट पाईपचा वापर करून पर्यायी मार्ग तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे पाणी अडणार नाही आणि एकाच वेळी बांधकामही करता येईल, असा मार्ग सुकर झाला.

या सूचनांनुसार बोरी व अंत्री देशमुख येथे मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये, तसेच येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सूचनाही संजय रायमुलकर यांनी दिल्या आहेत.

या तीनही पुलांच्या बांधकामामुळे मेहकर तालुक्यासह परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून, शेतकरी, विद्यार्थी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top