Mahabreaking

[breaking_news]

candle march: बोरगाव मंजू येथे कॅंडल मार्चद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

candle march: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोरगाव मंजू येथे कॅंडल मार्च नगर प्रदक्षिणेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. मुख्य मार्गावरून निघालेल्या या कॅंडल मार्चमध्ये शेकडो अनुयायांनी सहभाग नोंदवत डॉ. आंबेडकरांना मानवंदना अर्पण केली.

candle march

शेकडो अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग

बोरगाव मंजू : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोरगाव मंजू येथे कॅंडल मार्च नगर प्रदक्षिणेचे  आयोजन करण्यात आले. मुख्य मार्गावरून निघालेल्या या कॅंडल मार्चमध्ये शेकडो अनुयायांनी सहभाग नोंदवत डॉ. आंबेडकरांना मानवंदना अर्पण केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य रथावर आकर्षक सजावटीसह आरूढ करून रॅली काढण्यात आली. कॅंडल मार्चमध्ये बौद्ध उपासक-उपासिका, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, आम्रपाली महिला संघ, धम्मोदय पाठशाळेचे विद्यार्थी, रामजी नगर व भीम नगर बुद्ध विहार समित्या, जेष्ठ नागरिक तसेच तिन्ही नगरांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ही नगर प्रदक्षिणा सिद्धार्थ नगर येथील ‘अनाथ पिंडक बुद्ध विहार’ येथून प्रारंभ झाली. त्यानंतर रामजी नगर बुद्ध विहार व भीम नगर बुद्ध विहार मार्गे पुन्हा सिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बुद्ध वंदनेनिशी समारोप करण्यात आला.स्थानिक वातावरण धम्ममय झाला असून सर्वत्र ‘जय भीम’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top