Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Sakharkhedya’s dominance! : साखरखेर्ड्याचा दबदबा! सिंदखेडराजा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत मिळवली तीन पदे 

Sakharkhedya’s dominance! : सिंदखेडराजा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी निवडणुकीत यंदा साखरखेर्ड्याने आपली ठसठशीत छाप उमटवली आहे. १२ डिसेंबर रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपद वगळता उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार ही तीनही महत्त्वाची पदे साखरखेर्डा येथील शिक्षकांच्या झोळीत पडली.

Sakharkhedya's dominance!

अध्यक्षपदी अशोक नागरे; उपाध्यक्ष बाळू पऱ्हाड, सचिव रमेश जैवळ, कोषाध्यक्ष सुभाष गवई

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी निवडणुकीत यंदा साखरखेर्ड्याने आपली ठसठशीत छाप उमटवली आहे. १२ डिसेंबर रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपद वगळता उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार ही तीनही महत्त्वाची पदे साखरखेर्डा येथील शिक्षकांच्या झोळीत पडली.

अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे यांनी ठरल्याप्रमाणे दिलेल्या राजीनाम्यानंतर पंचायत समिती सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली. यामध्ये सर्वानुमते अशोक नागरे यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर बाळू राजाराम पऱ्हाड यांची उपाध्यक्ष, रमेश जैवळ यांची सचिव आणि सुभाष गवई यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर हारतुरे-शाली घालून सर्वांचे स्वागत करण्यात आले.

दरवर्षी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची संस्था परंपरा टिकवून ठेवत असल्याचे संचालक मंडळाने सांगितले. मात्र, या उत्साहात एक महत्त्वाची बाब दुर्लक्षिल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

१२ डिसेंबर हा लोकनेते, ओबीसी समाजाचे आधारस्तंभ स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांची पुण्यतिथी असून, सर्व संचालक एकत्र असताना त्यांच्या स्मृतीस अभिवादन न करण्याबद्दल शिक्षकांच्या गटांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. काही शिक्षकांनी नव्या पदाधिकाऱ्यांवर “अभिनंदनापेक्षा विस्मरण मोठे झाले” अशी टिप्पणी करत टीका केली आहे.

अशोक नागरे हे संयमी व जाणते नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अशा महत्त्वाच्या दिवशी मुंडे साहेबांच्या स्मृतीला वंदन न करण्याची चूक ‘अनवधानाने की जाणून-बुजून?’ यावर चर्चेला ऊत आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top