Mahabreaking

[breaking_news]

Revenue Samadhan Camp :सिंदखेडराजात उद्या महसूल समाधान शिबिर; विविध दाखले व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी

Revenue Samadhan Camp :नागरिकांना विविध महसुली दाखले आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बुधवार, २२ जुलै रोजी सिंदखेडराजा येथील मातोश्री लॉन्स येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Revenue Samadhan Camp

 

  महसूल, कृषी, पंचायत समितीसह विविध विभागांचा सहभाग; समाधान शिबिरासाठी प्रशासन सज्ज

गजानन तिडके

सिंदखेडराजा : नागरिकांना विविध महसुली दाखले आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बुधवार, २२ जुलै रोजी सिंदखेडराजा येथील मातोश्री लॉन्स येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित या शिबिरास आमदार मनोज कायंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या शिबिरात नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमी लेयर (NCL) प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ई-शिधापत्रिका तसेच इतर विविध महसुली प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

याशिवाय पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपालिका, महिला व बालविकास विभाग, भूमी अभिलेख कार्यालय तसेच इतर शासकीय विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ (देऊळगाव राजा) आणि तहसीलदार अजित दिवटे (सिंदखेडराजा) यांनी नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top