Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Revenue Department :अवैध रेती तस्करांवर महसूल विभागाची धाडसी कारवाई; आठवड्यात तीन टिप्पर जप्त

Revenue Department : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्र व धरण क्षेत्र अवैध उत्खनन आणि रेती तस्करीचे केंद्र बनले असताना महसूल विभागाने धाडसी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारे तीन टिप्पर आठवडाभरात जप्त केले आहेत. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

Revenue Department

गजानन तिडके

देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्र व धरण क्षेत्र अवैध उत्खनन आणि रेती तस्करीचे केंद्र बनले असताना महसूल विभागाने धाडसी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारे तीन टिप्पर आठवडाभरात जप्त केले आहेत. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक व तस्करीसाठी देऊळगाव मही धरण परिसर कुप्रसिद्ध ठरत आहे. महसूल विभाग, जिल्हास्तरीय पथके आणि पोलिस प्रशासन यांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध उत्खनन व वाहतुकीला काही प्रमाणात आळा बसत असला, तरी ग्रामपातळीवरील काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून कारवाईची माहिती तस्करांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना असूनही संबंधितांवर कारवाई का होत नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी पहाटे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या पथकाने ग्रामीण भागात गस्त घालत असताना नारायणखेड परिसरात एमएच-१७ सीव्ही-०४१३ क्रमांकाचा टिप्पर अवैध रेती वाहतूक करताना पकडला. कोणताही वैध परवाना नसल्याने तीन ब्रास रेतीसह लाखो रुपयांचा टिप्पर जप्त करून पुढील कारवाईसाठी अंढेरा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला.यापूर्वी ७ तारखेला नायब तहसीलदार सायली जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाफराबाद चौफुली परिसरात संशयास्पद टिप्परचा पाठलाग करून तो पकडण्यात आला होता. हा टिप्पर देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात जप्त करून पुढील कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३ तारखेला रात्री दिग्रस बु. परिसरात अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करणारा आणखी एक टिप्पर पकडून अंढेरा पोलिस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला.

या कारवाईत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, महसूल सेवक कविता शिरसाठ, परमेश्वर बुरुकुल, गजानन टेकाळे, ज्योती लोखंडे, विठ्ठल हरणे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी सहभागी होते. महसूल विभागाच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध रेती तस्करीवर लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top