Mahabreaking

[breaking_news]

Resident Deputy Collector Suresh Kavhale :निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांच्याकडून निमखेड येथे जनगणना कामाची पाहणी

Resident Deputy Collector Suresh Kavhale : देशाच्या आणि राज्याच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जनगणना मोहिमेची देऊळगाव राजा तालुक्यात वेगाने अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी नुकतीच तालुक्यातील निमखेड येथे भेट देऊन सुरू असलेल्या जनगणना कामाची सविस्तर पाहणी केली.

Resident Deputy Collector Suresh Kavhale

“एकही कुटुंब वंचित राहू नये”; जनगणना पाहणीदरम्यान निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गजानन तिडके

देऊळगाव राजा : देशाच्या आणि राज्याच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जनगणना मोहिमेची देऊळगाव राजा तालुक्यात वेगाने अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी नुकतीच तालुक्यातील निमखेड येथे भेट देऊन सुरू असलेल्या जनगणना कामाची सविस्तर पाहणी केली.

या दौऱ्यादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी कव्हळे यांनी गावातील विविध कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देत कामाचा आढावा घेतला. निमखेड येथे नियुक्त प्रगणक सौ. रंजना देशमुख या नागरिकांची माहिती नोंदविण्याचे काम करत होत्या. कव्हळे यांनी त्यांच्याकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली तसेच माहिती संकलनाची पद्धत, फॉर्म भरण्याची प्रक्रिया आणि डिजिटल प्रणालीवरील नोंदींची अचूकता याची बारकाईने पाहणी केली. सौ. रंजना देशमुख यांनी अत्यंत जबाबदारीने, कुशलतेने आणि नम्रतेने नागरिकांशी संवाद साधून माहिती संकलित केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी कव्हळे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.यावेळी बोलताना सुरेश कव्हळे यांनी सांगितले की, जनगणना हा भविष्यातील शासकीय योजना, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाचा महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळे एकही कुटुंब किंवा व्यक्ती जनगणना प्रक्रियेतून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी प्रगणकांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच नागरिकांनीही आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व खरी माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.या पाहणी दौऱ्यात त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून तांत्रिक अडचणी जाणून घेतल्या आणि निमखेड परिसरातील जनगणनेचे काम योग्य गतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, स्थानिक कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top