Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Reservation for the post of mayor: नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी

Reservation for the post of mayor: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जिल्हा परिषद अध्यक्षपदानंतर ६ ऑक्टाेबर राेजी राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्य बुलढाणा नगर पालिकेसह खामगाव, नांदुरा आणि लाेणार येथे सर्वच महिलांना संधी आहे तर देउळगाव राजा येथे अनुसुचीत जातीच्या महिलेसाठी संधी राहणार आहे. शेगाव आणि जळगाव जामाेदचे नगराध्यक्षपद हे अनुसुचीत जातीसाठी आरक्षीत झाले आहे. मलकापूर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर चिखली आणि मेहकर खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर आता पालिका निवडणुकीची इच्छुकांना प्रतीक्षा आहे.
Reservation for the post of mayor announced
बुलढाणा, खामगाव, नांदुरा आणि लाेणार खुल्या तर देउळगाव राजात एससी महिलेसाठी राखीव
बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जिल्हा परिषद अध्यक्षपदानंतर ६ ऑक्टाेबर राेजी राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्य बुलढाणा नगर पालिकेसह खामगाव, नांदुरा आणि लाेणार येथे सर्वच महिलांना संधी आहे तर देउळगाव राजा येथे अनुसुचीत जातीच्या महिलेसाठी संधी राहणार आहे. शेगाव आणि जळगाव जामाेदचे नगराध्यक्षपद हे अनुसुचीत जातीसाठी आरक्षीत झाले आहे. मलकापूर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर चिखली आणि मेहकर खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर आता पालिका निवडणुकीची इच्छुकांना प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात ११ नगर पालिका असून दाेन ठिकाणी नगर पंचायत आहे. सध्या ११ नगर पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरू आहे. जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगर पालिकांच्या अध्यक्षांच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले हाेते. साेमवारी राज्यातील २४७ नगर पालिका आणि १४७ नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षण साेडत ना. माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यापैकी अनुसुचीत जातीसाठी राखीव असलेल्या ३३ पैकी १७ पालिकांवर महिला राज येणार आहे.
नगर पालिका अध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांसह राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ११ पैकी सहा नगर पालिकांवर महिला राज येणार असल्याने अनेकांना आपल्या पत्नीला निवडणुक रिंगणात उतरावे लागणार आहे. सहा नगर पालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आरक्षण साेडत जाहीर झाल्यानंतर आता कुभी खुशी कभी गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top