Satishbhau Kayande: ग्रामविकास, पाणी व्यवस्थापन, सरपंच प्रशिक्षण आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे सचिव सतीश भाऊ कायंदे यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. भारत आणि मॉरिशस यांच्या संयुक्त विद्यमाने मॉरिशसमधील ले मेरिडियन इल मॉरिस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत वन वर्ल्ड समिट अँड अवॉर्ड्स २०२६’ या भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्यात सतीश भाऊ कायंदे यांना प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘लोकमत वन वर्ल्ड समिट’मध्ये देऊळगाव राजाच्या संस्थेचा डंका; प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान
गजानन तिडके
देऊळगाव राजा : ग्रामविकास, पाणी व्यवस्थापन, सरपंच प्रशिक्षण आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे सचिव सतीश भाऊ कायंदे यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. भारत आणि मॉरिशस यांच्या संयुक्त विद्यमाने मॉरिशसमधील ले मेरिडियन इल मॉरिस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत वन वर्ल्ड समिट अँड अवॉर्ड्स २०२६’ या भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्यात सतीश भाऊ कायंदे यांना प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सतीश भाऊ कायंदे यांनी श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था, देऊळगाव राजाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये सरपंच प्रशिक्षण, पाणी व्यवस्थापन, ग्रामविकास तसेच विविध कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विकासाच्या विविध संकल्पनांशी जोडण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे.

यासोबतच संस्थेअंतर्गत कार्यरत समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी आणि समर्थ कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचीही या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली. शिक्षण, प्रशिक्षण आणि ग्रामविकास या तिन्ही क्षेत्रांत संस्थेने केलेल्या कार्याचा गौरव या निमित्ताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झाला.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्या हस्ते सतीशभाऊ कायंदे यांना प्रदान करण्यात आला. मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखूल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आंतरराष्ट्रीय सोहळा दिमाखात पार पडला. भारत व मॉरिशस या दोन्ही देशांतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक संस्था, उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी या सोहळ्यास उपस्थित होते.
श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे सचिव सतीश भाऊ कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामविकासात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली दखल ही देऊळगाव राजा तसेच बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
ग्रामीण विकासाला प्रशिक्षणाची जोड देत शाश्वत पाणी व्यवस्थापन, सक्षम स्थानिक नेतृत्व आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संस्था करीत असलेल्या प्रयत्नांना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान संस्थेच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

