Mahabreaking

[breaking_news]

More :ग्रामविकासाची दखल; मनोज मोरे यांना ‘संवेदनशील ग्राम’ पुरस्कार

More : चांगेफळ आणि साखरखेर्डा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांना जिल्हा परिषदेच्या वतीने ‘संवेदनशील ग्राम’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Manoj More

 विकासकामांच्या नियोजनाची पावती; ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे सन्मानित

साखरखेर्डा   : चांगेफळ आणि साखरखेर्डा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांना जिल्हा परिषदेच्या वतीने ‘संवेदनशील ग्राम’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बुलढाणा जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींची सीईओ संग्राम अभियानासाठी निवड करण्यात आली होती. विकासकामांना गती देणे हा या अभियानाचा उद्देश होता. या अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत इमारत, शाळांची दुरुस्ती व देखभाल आदी कामांना विशेष प्राधान्य देण्यात आले. सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ ग्रामपंचायतीचाही या अभियानात समावेश होता.

ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळात सुनियोजित नियोजन करून गावातील विविध विकासकामे मार्गी लावली. तसेच ‘समृद्ध ग्रामपंचायत’ अभियानांतर्गत प्रभावीपणे काम केल्याने चांगेफळ ग्रामपंचायतीची ‘संवेदनशील ग्राम’ पुरस्कारासाठी निवड झाली.

१४ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते मनोज मोरे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

मनोज मोरे यांनी यापूर्वी साखरखेर्डा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून तब्बल १५ वर्षे काम केले आहे. ज्ञानेश्वर चनखोरे यांची पदोन्नती झाल्यानंतर पुन्हा साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा कारभार मनोज मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

चांगेफळ आणि साखरखेर्डा या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळताना मनोज मोरे यांनी दाखविलेली कार्यक्षमता व कामाची हातोटी कौतुकास्पद आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल यापूर्वीही विविध पुरस्कारांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top