Rajesh Gavande : हाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस (एमपीसीसी) अंतर्गत राजेश केशवराव गावंडे यांची राज्य उपाध्यक्ष तसेच अमरावती विभाग समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र ८ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले.

राजेश गावंडे यांना किसान काँग्रेसमध्ये दुहेरी जबाबदारी; शेतकरी हक्कांसाठी लढण्याचे आवाहन
बाळापूर : महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस (एमपीसीसी) अंतर्गत राजेश केशवराव गावंडे यांची राज्य उपाध्यक्ष तसेच अमरावती विभाग समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र ८ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले.

नियुक्तीपत्रात नव्या जबाबदारीसह राजेश गावंडे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करावा, किसान काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी द्यावी आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी संघटनात्मक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
राजेश गावंडे यांच्यावर सोपविण्यात आलेल्या या दुहेरी जबाबदारीमुळे अमरावती विभागातील किसान काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला गती मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. शेतकरी प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे भूमिका मांडत संघटना विस्ताराचे काम गावंडे यांच्या माध्यमातून वेगाने पुढे जाईल, असा विश्वासही काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

