Professor Pawan Avinash Jadhav : सामाजिक, शैक्षणिक व मानवी मूल्यांची जपणूक करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे प्रा. पवन अविनाश जाधव यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याबद्दल ‘अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी, शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी केलेल्या निस्वार्थ कार्याची ही सन्माननीय पोचपावती असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याची घेतली दखल
बुलढाणा : सामाजिक, शैक्षणिक व मानवी मूल्यांची जपणूक करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे प्रा. पवन अविनाश जाधव यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याबद्दल ‘अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी, शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी केलेल्या निस्वार्थ कार्याची ही सन्माननीय पोचपावती असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
प्रा. जाधव यांचे सामाजिक कार्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून तसेच समता, न्याय, बंधुता आणि मानवमुक्तीच्या तत्त्वांपासून प्रेरित आहे. “शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र आत्मसात करून प्रा. जाधव यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजजागृती, मूल्यसंस्कार आणि सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतला आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेनेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, संधी व न्याय पोहोचविण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यापूर्वीही प्रा. पवन जाधव यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच बुद्ध–फुले–शाहू–आंबेडकर आणि गांधीवादी विचारसरणीवर आधारित कार्याची दखल घेत ‘डॉ. भीमराव आंबेडकर ज्ञानशक्ती पुरस्कार’ आणि ‘गांधी प्रेरणा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ऑक्टोबर महिन्यात फेअर व्हिजन फाउंडेशनच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला होता. विविध पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची सातत्याने दखल घेतली जात आहे.
शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, सामाजिक जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्यावर प्रा. जाधव यांचा विशेष भर आहे. युवकांना योग्य दिशा देणे, त्यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण करणे आणि संविधानात्मक मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. सामाजिक सलोखा, समता व बंधुतेचा संदेश देत राष्ट्रनिर्मितीला हातभार लावणारे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
‘अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान’ हा त्यांच्या दीर्घकालीन सेवाभावी कार्याचा गौरव असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन केलेल्या या कार्यामुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना नवी दिशा, ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

