Mahabreaking

[breaking_news]

Naik School’s : नाईक विद्यालयाची विज्ञान प्रतिकृती विदर्भ स्तरावर निवड

Naik School’s : विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (अमरावती) व महाराष्ट्र माध्यमिक शाळा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान मॉडेल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात परशुराम नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेली क्लायमेट चेंजसंदर्भातील, जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण आणणे, वायू प्रदूषणाला आळा घालणे तसेच पर्यावरणपूरक अशा सर्व दृष्टीने महत्त्वाची असलेली “अ मॉडर्न ऑप्शन फॉर फ्युचर मॉडर्न कम्युनिकेशन” ही विज्ञान प्रतिकृती विशेष ठरली.

Naik School's

संजय तायडे

बोरगाव मंजू : विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (अमरावती) व महाराष्ट्र माध्यमिक शाळा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान मॉडेल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात परशुराम नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेली क्लायमेट चेंजसंदर्भातील, जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण आणणे, वायू प्रदूषणाला आळा घालणे तसेच पर्यावरणपूरक अशा सर्व दृष्टीने महत्त्वाची असलेली “अ मॉडर्न ऑप्शन फॉर फ्युचर मॉडर्न कम्युनिकेशन” ही विज्ञान प्रतिकृती विशेष ठरली.

ही विज्ञान प्रतिकृती विज्ञान शिक्षक विजय यशवंत पजई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी राधा निलेश पोपळे व नेहा शैलेश गवई यांनी तयार केली. या प्रतिकृतीची निवड धरमपेठ सायन्स कॉलेज, नागपूर येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. ही महत्त्वपूर्ण विज्ञान प्रतिकृती प्रत्यक्षात अमलात आल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच आधुनिक दळणवळणाच्या क्षेत्रात अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

नागपूर येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रतिकृतीची निवड झाल्याबद्दल यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षक यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य मनोज आगरकर, जी. टी. पोहणकर तसेच पर्यवेक्षक एस. एच. भदे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.शाळेचे अध्यक्ष किरणराव नाईक, दीपकराव नाईक, डॉ. प्रथमेश नाईक, एन. एस. गमे, श्री. के. एम. जोशी, एस. जी. बोरगावकर, श्याम देशमुख, अभिनव नाईक आदी मान्यवरांनीही विदर्भस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top