Prabhakar Patil : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार बुलढाणा तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी प्रभाकर श्रीराम वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे बुलढाणा तालुका काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बूथ पातळीपर्यंत काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत करणार : प्रभाकर वाघ
बबन फेपाळे
रुईखेड मायंबा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार बुलढाणा तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी प्रभाकर श्रीराम वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे बुलढाणा तालुका काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या २१ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिकृत पत्रानुसार (जावक क्र. ४६३/२०२६) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून प्रभाकर वाघ यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश रामभाऊ अवचार यांना पाठविण्यात आले आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची माहिती देऊन प्रभाकर पाटील वाघ यांना नियुक्तीपत्र देण्याचे निर्देशही पत्रातून देण्यात आले आहेत.
नियुक्तीनंतर प्रभाकर वाघ यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. मिळालेली जबाबदारी ही केवळ पद नसून काँग्रेसची संघटना अधिक सक्षम, सक्रिय आणि सर्वसमावेशक करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बूथ पातळीपर्यंत संघटना मजबूत करणार’
“काँग्रेसच्या विचारधारेवर आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेत तळागाळातील संघटना मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणार आहे. ग्रामीण भागापासून प्रत्येक बूथपर्यंत संघटना मजबूत करणे, नवीन कार्यकर्त्यांना जोडणे, युवक व महिलांचा सहभाग वाढविणे तसेच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार आहे,” असे प्रभाकर वाघ यांनी सांगितले.
वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बुलढाणा तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आपल्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी सोपविल्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

