Mahabreaking

[breaking_news]

Poor quality grains : निकृष्ट धान्यामुळे गरीबांची अडचण वाढली!

Poor quality grains सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात नाराजी व अस्वस्थता वाढली असून नागरिक संतप्त आहेत.

Poor quality grains


स्वस्त धान्य दुकानातील पुरवठ्यावर नागरिकांचा संताप

रमेश खंडागळे

बीबी : सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात नाराजी व अस्वस्थता वाढली असून नागरिक संतप्त आहेत.

शासन गोरगरीब कुटुंबांची अन्नाची गरज भागवण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारामार्फत मोफत अन्नधान्य वितरीत करते. परंतु सध्या बीबी येथील राशन दुकानांतून गव्हाऐवजी मिळणारी हायब्रीड ज्वारी अत्यंत खराब दर्जाची असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ज्वारीला कुबट वास येत असून किड लागल्यामुळे धान्याचा फुफाटा झाला आहे. त्या अवस्थेतच हे धान्य दुकानातून गरीबांना मोजून देण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

यासंबंधी विचारणा केली असता राशन दुकानदार नागरिकांना उर्मट उत्तर देत “फुकटचे धान्य आम्ही कुठून चांगले देऊ?” अशी प्रतिक्रिया देत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिक व दुकानचालक यांच्यात वाद, तंटे होत असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

नागरिकांचा सवाल असा आहे की, “हेच निकृष्ट धान्य तहसीलदार, पुरवठा अधिकारी किंवा संबंधित यंत्रणेचे कर्मचारी स्वतः खातील का? आपल्या मुलांना देतील का?” शेतकरी जनावरांना यापेक्षा अधिक चांगले भरडधान्य व ढेप खाऊ घालतात, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

स्वस्त धान्य दुकानांतून स्वच्छ व उत्कृष्ट दर्जाचे धान्य मिळावे, गोदामातील साठा योग्य पद्धतीने सांभाळला जावा आणि नागरिकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकून राहावे, यासाठी पुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

राशन दुकानदार शिवानंद हाजबे यांचे प्रतिपादन:
“पुरवठा विभागाकडून जसा माल मिळतो, तसा आम्ही वाटप करतो,” असे ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top