Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

country liquor : दुचाकीवरून देशी दारुची वाहतुक, लाेणार पाेलिसांची दाेघांवर कारवाई 

country liquor : दुचाकीवरून देशी दारुची वाहतुक करणाऱ्या दाेघांन लाेणार पाेलिसांनी १४ ऑक्टाेंबर राेजी रंगेहाथ पकडले. ही कारवाई पेट्रोलिंग दरम्यान  लोणी रोड परिसरात करण्यात आली असून, पोलिसांनी दुचाकीसह देशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे.
country liquor on two-wheelers
दारुचा माेठा साठा केला जप्त : पेट्रोलिंग करीत असताना दुचाकी केली जप्त
लोणार : दुचाकीवरून देशी दारुची वाहतुक करणाऱ्या दाेघांन लाेणार पाेलिसांनी १४ ऑक्टाेंबर राेजी रंगेहाथ पकडले. ही कारवाई पेट्रोलिंग दरम्यान  लोणी रोड परिसरात करण्यात आली असून, पोलिसांनी दुचाकीसह देशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणार येथील एका अधिकृत दारू विक्री दुकानातून देशी दारूचे बॉक्स पोत्यात भरून ग्रामीण भागात विक्रीसाठी नेण्यात येत होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लोणार पोलिस स्टेशनचे नायक संजय जाधव आणि पोलिस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण हे लोणी रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना त्यांनी एक संशयास्पद दुचाकीचा पाठलाग करून ती थांबवली.
  दुचाकी क्रमांक एमएच 28 बीडी 4432 या वाहनावर देशी दारू ‘भिंगरी’ या ब्रँडच्या १८० मिलिलिटर क्षमतेच्या कंपनी सीलबंद ७२ बाटल्या आढळून आल्या. या दारूचा एकूण साठा ५,७६० रुपये किंमतीचा असून, दुचाकीसह मिळून सुमारे ३५,७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा भगवान मापारी (रा. पिपळखुटा) आणि रमेश सुकलाल बोरकर (रा. अंजनी खुर्द) या दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणार पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, शहरात आणि ग्रामीण भागात सकाळी-सकाळी खुलेआम अवैध दारूची विक्री सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अधिकृत परवानाधारक दारू विक्री दुकानांतून मोठ्या प्रमाणावर दारू बाहेर काढून ती अवैधरित्या विकली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, अशा दुकानांवरही दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top