Police raid : अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी धडक कारवाई करत 3 लाख 75 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जून रोजी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास सिनगाव जहाँगीर ते मेव्हणा राजा मार्गावरील बसस्थानक चौक परिसरात अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पंचांसमक्ष पोलिसांनी छापा टाकून संशयित वाहनाची तपासणी केली.

बसस्थानक चौकात कारमधून दारूची तस्करी उघड; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी धडक कारवाई करत 3 लाख 75 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जून रोजी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास सिनगाव जहाँगीर ते मेव्हणा राजा मार्गावरील बसस्थानक चौक परिसरात अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पंचांसमक्ष पोलिसांनी छापा टाकून संशयित वाहनाची तपासणी केली.
या कारवाईदरम्यान आरोपी प्रदीप कारभारी इंगळे (वय 32), प्रमोद उर्फ बाळू नारायण लताड (वय 20), जब्बार खान बशिर खान पठाण (वय 35) आणि ज्ञानेश्वर शेषराव खरात, सर्व रा. वाघुळ, ता. जि. जालना यांच्या ताब्यातून देशी दारूचा मोठा साठा आढळून आला.
पोलिसांनी सखू संत्रा कंपनीच्या 180 एमएलच्या 336 देशी दारूच्या बाटल्या, सात बॉक्समध्ये भरलेला साठा जप्त केला. या दारूची किंमत 30 हजार 240 रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय दोन ओप्पो कंपनीचे मोबाईल फोन (अंदाजे किंमत 20 हजार रुपये) तसेच अवैध दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कंपनीची पांढऱ्या रंगाची चारचाकी (क्र. एमएच-05 एएस-6685) किंमत अंदाजे 3 लाख 25 हजार रुपये जप्त करण्यात आली.
या कारवाईत एकूण 3 लाख 75 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव नारायण कुटे यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा क्रमांक 287/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव नारायण कुटे करीत असून, अवैध मद्य वाहतुकीच्या साखळीतील इतर संबंधितांचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

