Police raid in Borgaon Manju : येथे अवैधरित्या गोवंश मांसाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोरगाव मंजू पोलिसांनी रविवारी सकाळी छापा टाकून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत अंदाजे १५० किलो गोवंश मांसासह लोखंडी कत्ते, तराजू काटा, वजन व इतर साहित्य असा एकूण ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

150 किलो गोवंश मांसासह 31 हजारांचा एवज हस्तगत
बोरगाव मंजू : येथे अवैधरित्या गोवंश मांसाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोरगाव मंजू पोलिसांनी रविवारी सकाळी छापा टाकून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत अंदाजे १५० किलो गोवंश मांसासह लोखंडी कत्ते, तराजू काटा, वजन व इतर साहित्य असा एकूण ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे गुन्हा क्रमांक 409/2026 दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 मधील कलम 5, 5(ब), 5(क), 9, 9(अ) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 325 अन्वये नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्याद पोलीस शिपाई पंकज भीमराव बोराखडे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई 5 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास बोरगाव मंजू येथे करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी गोवंश मांसाची विक्री सुरू असल्याचा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला असता तिघेही संशयित गोवंश मांसासह आढळून आले, असा पोलिसांचा दावा आहे.
या प्रकरणातील आरोपी म्हणून अशफाक अहमद शेख दस्तगीर (वय 40), शेख महेमूद शेख यासीन (वय 32) आणि मोहम्मद अफसर शेख गणी (वय 49), तिन्ही रा. बोरगाव मंजू, ता. जि. अकोला, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या पंचनाम्यानुसार, अशफाक अहमद शेख दस्तगीर यांच्या ताब्यातून अंदाजे 60 किलो गोवंश मांस (किंमत 12 हजार रुपये), एक लोखंडी कत्ता, एक लोखंडी तराजू काटा व एक लाकडी कुंदा असा 12 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शेख महेमूद शेख यासीन यांच्या ताब्यातून अंदाजे 50 किलो गोवंश मांस (किंमत 10 हजार रुपये), एक लोखंडी कत्ता, एक लोखंडी तराजू काटा, एक लाकडी कुंदा आणि एक किलोचे लोखंडी वजन असा 10 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय मोहम्मद अफसर शेख गणी यांच्या ताब्यातून अंदाजे 40 किलो गोवंश मांस (किंमत 8 हजार रुपये) आणि एक लोखंडी कत्ता असा 8 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या तिन्ही आरोपींकडून मिळून एकूण 150 किलो गोवंश मांस आणि अन्य साहित्य असा 31 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
या कारवाईत ठाणेदार सुनील वानखडे, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे तसेच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या मांसाच्या नमुन्यांबाबत आवश्यक तपासणी प्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.बोरगाव मंजू पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अवैधरीत्या गोवंश मांस विक्रीच्या संशयावरून सुरू असलेल्या कारवायांकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

