Mahabreaking

[breaking_news]

Pathan Sajidkhan :मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त पठाण साजिदखान यांना ‘स्टेट बेस्ट टीचर अवार्ड-२०२६’

Pathan Sajidkhan : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मो. अली जोहर उर्दू हायस्कूल, सेवली (ता. जि. जालना) येथील सहशिक्षक तथा मलकापूर पांग्रा येथील पठाण साजिदखान नजबरखान यांना मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘स्टेट बेस्ट टीचर अवार्ड-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

Pathan Sajidkhan

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनतर्फे सन्मान

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मो. अली जोहर उर्दू हायस्कूल, सेवली (ता. जि. जालना) येथील सहशिक्षक तथा मलकापूर पांग्रा येथील पठाण साजिदखान नजबरखान यांना मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘स्टेट बेस्ट टीचर अवार्ड-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री, महान स्वातंत्र्यसैनिक, प्रख्यात विचारवंत आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पठाण साजिदखान नजबरखान यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी घेतलेले परिश्रम, त्यांच्यातील बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक क्षेत्रातील निःस्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देणारा घटक नसून समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षक पार पाडत असतो. याच भूमिकेतून पठाण साजिदखान यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे पुरस्काराच्या सन्मानपत्रात नमूद करण्यात आले आहे.

ज्ञाननिष्ठा, कर्तव्यपरायणता, समर्पणभावना आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेले परिश्रम यांचा गौरव म्हणून त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीस हातभार लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या पुरस्कारामुळे पठाण साजिदखान यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव झाला असून, त्यांच्या यशाबद्दल शिक्षक, शिक्षणप्रेमी, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top