Operation Prahar : अवैध शस्त्रांविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी चाकू, दोन मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्रे बाळगल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

अकोला स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त
अकोला : अवैध शस्त्रांविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी चाकू, दोन मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्रे बाळगल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदे व अवैध शस्त्रांविरुद्ध ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याच्या विशेष सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी पथक तयार केले होते.
गुप्त माहितीवरून सापळा
दि. ३० सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोला पोलीस हद्दीत गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कानशिवनी येथे काही इसम देशी कट्टा व चाकू घेऊन फिरत असून, त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कानशिवनी येथील गोरक्षण परिसरात धाव घेत सापळा रचला. यावेळी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेतली असता विजय अंबादास पवार, रा. खांबोरा याच्याकडे कमरेला असलेल्या हाफ पॅन्टमध्ये देशी बनावटीचा कट्टा आढळून आला. या कट्ट्याची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असून, त्याच्या मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळली. त्यांची अंदाजे किंमत दोन हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच संदीप वाडुरवाघ याच्याकडे अंदाजे एक हजार रुपये किमतीचे लोखंडी धारदार चाकू आढळून आले. तर सहील उर्फ वैभव देवानंद गावंडे, रा. खांबोरा याच्यासह तिन्ही आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
४९ हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत देशी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे, धारदार चाकू, दोन मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच कटकारस्थानाच्या उद्देशाने शस्त्रे बाळगल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे संभाव्य गुन्हेगारी कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कलम ६१(२), ३(५) बीएनएससह कलम ३ व २५ आर्म्स ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या पथकाने केली कारवाई
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व पोलीस उपअधीक्षक श्री. बी. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी निलेश देशमुख, गोपाल जाधव, विष्णु बोडखे, माजीद पठाण, अनिल चव्हाण तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराये, सुलतान पठाण, फिरोज खान, भारकर धोत्रे, अमित दुबे, अब्दुल माजिद, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, खुशाल नेमाडे, मंगेश इंगळे, वसीमोद्दीन, एजाज अहमद, राहुल गायकवाड, स्वप्नील खेडकर, श्रीकांत पातोंड, अन्सार अहमद, राज चंदेल, आकाश मानकर, धिरज वानखडे, पवन डांबलकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, सतीश पवार, अशोक सोनवणे, भिमराव दिपके तसेच चालक विनोद ठाकरे, प्रविण कश्यप, रामकिसन डोईफोडे, मनिष ठाकरे, देवानंद खरात आणि प्रकाश लोखंडे यांनी सहभाग घेतला.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

