Navyug Vidyalaya’s : नवयुग विद्यालयाच्या वतीने संविधान दिनानिमित्त सोमवारी गावामध्ये भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. सकाळी ७.३० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संविधानावर आधारित आकर्षक सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून रॅलीला प्रारंभ झाला.

वाडी अदमपूर : नवयुग विद्यालयाच्या वतीने संविधान दिनानिमित्त सोमवारी गावामध्ये भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. सकाळी ७.३० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संविधानावर आधारित आकर्षक सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून रॅलीला प्रारंभ झाला.
रॅली दरम्यान संपूर्ण गावातून मार्गक्रमण करताना गावातील मुख्य चौकांमध्ये इयत्ता ९ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक बळवंत गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानावरील पथनाट्य सादर केले. भारतीय संविधानाने दिलेले हक्क, कर्तव्ये व अधिकार जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न पथनाट्यातून करण्यात आला. दरम्यान “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”, “संविधान चिरायू होवो”, “माझा मान संविधान”, “नको राजेशाही, नको हुकूमशाही – संविधानाने दिली लोकशाही” अशा विविध घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. रॅलीनंतर संविधान अभ्यासक भीमराव परघरमोल यांनी उपस्थित विद्यार्थी, नागरिकांना संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क आणि अधिकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी मानवी साखळी तयार करून “माझे संविधान माझा मान” या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला संत तुकाराम शिक्षण संस्थेचे संचालक गणेशराव वाघ, भीमराव परघरमोल, मुख्याध्यापक अरुण टाले, शिक्षक हर्षवर्धन मोरे, बळवंत गावंडे, गजानन पाथ्रीकर, सोपान यादगीरे, मंगेश माकोडे, कैलास अघडते, अनंत तळोकार, संजय देशमुख, संजय लव्हारे, सिमाताई वैराळे, स्वातीताई शेलकर, संजय दाते, रविंद्र गादे, ज्ञानेश्वर डांगे यांच्यासह वर्ग ५ ते १० चे विद्यार्थी, गावातील बालक–बालिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

