Mahabreaking

🔴 BREAKING
As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास

Disabled people : दिव्यांगांना मिळणार २५०० रुपये; कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

Disabled people : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना शासन निर्णय दिनांक १५ सप्टेंबर २०२५ नुसार प्रति महिना मिळणारे अनुदान १५०० रुपयांवरून २५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यानुसार मेहकर तहसील कार्यालयाच्या (संगायो विभाग) वतीने लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Disabled people

मेहकर : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना शासन निर्णय दिनांक १५ सप्टेंबर २०२५ नुसार प्रति महिना मिळणारे अनुदान १५०० रुपयांवरून २५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यानुसार मेहकर तहसील कार्यालयाच्या (संगायो विभाग) वतीने लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेहकर तालुक्यातील एकूण ३२१५ दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर २०२५ पासून वाढीव दराने अनुदान देण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्याचे १५०० रुपये डीबीटीद्वारे प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी आता पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

 ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्डची ई-प्रती, यूडीआयडी (UDID) कार्ड, बँक पासबुक (रंगीत छायांकित प्रती) ही सर्व कागदपत्रे रंगीत प्रतीत तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार शाखेत सादर करावीत, असे नायब तहसीलदार विवेक नालट यांनी आवाहन केले आहे.

८२२ लाभार्थ्यांनी १५ दिवसांत आधार अपडेट करणे आवश्यक

मेहकर तालुक्यातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी विधवा/परितक्ता/घटस्फोटीत लाभार्थी आणि दुर्धर आजार लाभार्थी अशा एकूण ८२२ जणांचे आधार अपडेट करण्याचे काम डीबी पोर्टलवर प्रलंबित आहे.

या सर्व लाभार्थ्यांनी आधार कार्ड , बँक पासबुक, आधारला लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन वृत्तपत्र प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत मेहकर तहसील कार्यालयात उपस्थित राहावे. अन्यथा, मुदतीत हजर न राहिलेल्या लाभार्थ्यांची नावे डीबीटी पोर्टलवरून कमी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top