Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Chief Minister Devendra Fadnavis :नवी मुंबई कार्गो हबमुळे महाराष्ट्राच्या व्यापाराला नवी झेप – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित एअर कार्गो हबचे भूमिपूजन करण्यात आले. हा उपक्रम भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा ठरेल असून राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Chief Minister Devendra Fadnavis
फेडेक्सच्या अत्याधुनिक कार्गो हबचे भूमिपूजन; उद्योग-निर्यातीला मोठी चालना

नवी मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित एअर कार्गो हबचे भूमिपूजन करण्यात आले. हा उपक्रम भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा ठरेल असून राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि महाराष्ट्राच्या भक्कम पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचा महत्त्वपूर्ण पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडचे संचालक जीत अदानी, तसेच फेडेक्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फेडेक्सच्या कार्गो हबचे भूमिपूजन ही भारत, महाराष्ट्र आणि मुंबईसाठी ऐतिहासिक घटना आहे. फेडेक्सची जागतिक स्तरावरील मजबूत उपस्थिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रातील कार्गो हाताळणी व व्यापाराला मोठी चालना मिळेल. भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त प्रवासी व कार्गो विमानतळांपैकी एक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारताच्या भविष्यातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असून २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देईल. पुरवठा व्यवस्थापन खर्च कमी करणे देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक असून फेडेक्ससारख्या कंपन्यांमुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा खर्च कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जीत अदानी यांनी सांगितले की, फेडेक्सने नवी मुंबईची केंद्र म्हणून केलेली निवड ही महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे प्रतीक आहे. जवाहरलाल नेहरू बंदराजवळील धोरणात्मक स्थान आणि अत्याधुनिक कार्गो सुविधा यामुळे हे हब जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरेल. या प्रकल्पामुळे निर्यातदार, लघु-मध्यम उद्योग, औषध व कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी थेट जोडणी मिळेल.
राज सुब्रमण्यम म्हणाले की, नवी मुंबई येथे उभारला जाणारा हा पूर्णपणे स्वयंचलित आणि अत्याधुनिक एअर कार्गो हब भारताच्या जागतिक व्यापार जोडणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. सुमारे ३ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात २५० दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात येत असून हा फेडेक्सचा भारतातील पहिलाच हब असेल.
या सुविधेमुळे दक्षिण-पूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिका या प्रमुख बाजारपेठांशी भारताचा थेट व्यापार संपर्क अधिक मजबूत होईल. पुरवठा व्यवस्थापन, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित क्षेत्रांत सुमारे ६ हजारांहून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. अत्याधुनिक स्वयंचलित सॉर्टिंग प्रणाली, उच्च-गती स्क्रीनिंग तंत्रज्ञान आणि समर्पित विमान पार्किंग सुविधांमुळे आयात-निर्यात प्रक्रियेचा वेग मोठ्या प्रमाणात वाढेल.
प्रारंभी या विमानतळाची कार्गो क्षमता सुमारे ०.५ दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक राहणार असून पुढील टप्प्यांत ती सुमारे ३.२५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या निर्यात-आयात क्षमतेत वाढ होऊन महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top