Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

National Health Fair :शेगावात ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा–२०२६’चा उद्या शुभारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

National Health Fair : आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासम्मेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा–२०२६’ला आजपासून प्रारंभ होत आहे. २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान विसावा मैदान, विसावा भक्तनिवास संकुल, आनंद सागर रोड येथे हा मेळावा पार पडणार आहे.या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा आयुष अधिकारी प्रशांत तांगडे (बुलढाणा) यांनी केले आहे.

National Health Fair

शेगाव : आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासम्मेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा–२०२६’ला आजपासून प्रारंभ होत आहे. २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान विसावा मैदान, विसावा भक्तनिवास संकुल, आनंद सागर रोड येथे हा मेळावा पार पडणार आहे.या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा आयुष अधिकारी प्रशांत तांगडे (बुलढाणा) यांनी केले आहे.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या 

मेळाव्याचे उद्घाटन बुधवारी दुपारी १२ वाजता भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी बहुविध आरोग्य सेवा

मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी उपचार सेवा उपलब्ध राहणार आहेत. तसेच नेत्रतपासणी शिबिर, दिव्यांगांसाठी ADIP तपासणी व साहित्य वाटप, विविध आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रबोधन कार्यक्रम आणि शेतकऱ्यांसाठी वनौषधी लागवड, प्रक्रिया व विपणन कार्यशाळाही होणार आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा

🔹 २५ फेब्रुवारी २०२६ – दुपारी १२:०० वा. उद्घाटन समारंभ राष्ट्रपती महोदया यांच्या शुभहस्ते.

🔹 २६ फेब्रुवारी २०२६ – दुपारी १२:०० वा. ‘घरचा वैद्य – आजीबाईचा बटवा’ घरगुती आयुर्वेदिक प्रथमोपचार प्रशिक्षण.

दुपारी ३:०० वा. शेतकरी बांधवांसाठी वनौषधी लागवड, प्रक्रिया व विपणन कार्यशाळा.

🔹 २७ फेब्रुवारी २०२६ – सकाळी १०:०० ते ४:०० वा. वयोश्री व ADIP तपासणी व साहित्य वाटप शिबिर; दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी व नोंदणी.

दुपारी ४:०० वा. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन कार्यक्रम.

🔹 २८ फेब्रुवारी २०२६ –

सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वा. मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी शिबिर.

या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यानिमित्त राष्ट्रपती, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, राज्यातील लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच देशभरातील वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा आयुष अधिकारी प्रशांत तांगडे (बुलढाणा) यांनी जिल्ह्यातील नागरिक तसेच आयुष वैद्यकीय व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. शेगावमध्ये होत असलेला हा आरोग्य मेळावा सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवेची मोठी संधी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top