Mahabreaking

[breaking_news]

Monkey and Its Offspring Seriously Injured :मलकापूर पांग्रा येथे विजेच्या धक्क्याने माकडासह पिल्लू गंभीर जखमी

Monkey and Its Offspring Seriously Injured : विद्युत प्रवाह असलेल्या वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एका माकडासह त्याचे पिल्लू गंभीर जखमी झाल्याची घटना मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजारात शनिवारी सायंकाळी घडली. या माकडाविषयी माहिती देवूनही वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर उशीरा पोहचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Monkey and Its Offspring Seriously Injured

ग्रामस्थांची तत्पर मदत; वनविभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : विद्युत प्रवाह असलेल्या वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एका माकडासह त्याचे पिल्लू गंभीर जखमी झाल्याची घटना मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजारात शनिवारी सायंकाळी घडली. या माकडाविषयी माहिती देवूनही वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर उशीरा पोहचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बाजार परिसरातील रोहित्राजवळ एका बाजूला पिंपळाचे तर दुसऱ्या बाजूला लिंबाचे झाड आहे. या झाडांदरम्यान उडी मारताना वानराचा ११ केव्ही विजेच्या तारेस स्पर्श झाला. त्यामुळे बसलेल्या तीव्र विजेच्या धक्क्यामुळे वानराचे समोरील दोन्ही पाय जळून निकामी झाले. घटनेची माहिती रहीम खाँ शानूर खाँ पठाण यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील पांडुरंग सोनुने यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांच्या मदतीने वानरावर प्राथमिक उपचार केले. या मदतकार्यात नीलेश वरकड, विशाल खंदारे, अरशदुल्ला खाँ पठाण, संतोष वाहिले, सतीश काकडे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.

दरम्यान, पोलीस पाटील यांनी वनविभागाला माहिती दिली असता “रात्र झाली असून सकाळी येतो” असे सांगत त्यांनी तत्काळ येण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्रभर जखमी वानर वेदनेने तडफडत असताना त्याचे पिल्लू आरडाओरडा करत आईभोवती फिरत होते. वानराची ही दयनीय अवस्था पाहून उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू आले.

ग्रामस्थांनी रात्री कुत्र्यांचा हल्ला होऊ नये म्हणून जखमी वानराला सुरक्षित ठिकाणी ठेवले. मात्र सकाळी पुन्हा संपर्क साधल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत वानर तेथून निघून गेले होते. त्यानंतरही वनविभागाने शोध घेण्याची तसदी घेतली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

उडी मारताना विजेच्या तारेचा स्पर्श होऊन खाली फेकले गेल्यामुळे वानर डीपीच्या लोखंडी रॉडवर पडले आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्याचे दोन्ही हात जळून खाक झाले होते. या घटनेने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत असून, वनविभागाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top