Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

MLA Manoj Kayande : जुन्या पेन्शनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार मनोज कायंदे सभागृहात आक्रमक

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघाचे युवा आमदार मनोज कायंदे यांनी जुन्या पेन्शनसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मांडलेल्या मुद्देसुद मागण्यांना सरकारनेही मंजूरी दिली. यामध्ये गोपीनाथरावजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कष्टकरी शेतमजुरांचा समावेश, तसेच कापूस खरेदी मर्यादा ५ क्विंटलवरून थेट २३ क्विंटल प्रति हेक्टर वाढविण्याचा नि र्णय शासनाने घेतला आहेत. तसेच सिंदखेड राजा मतदार संघातील ग्रामीण भागासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, कायंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

MLA Manoj Kayande

 कापूस खरेदीच्या मर्यादेत ५ क्विंटलवरून थेट २३ क्विंटल प्रति हेक्टर वाढ , सिंदखेड राजा मतदार संघातील ग्रामीण भागासाठी 200 कोटी मंजूर

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सिंदखेड राजा मतदारसंघाचे युवा आमदार मनोज कायंदे यांनी जुन्या पेन्शनसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मांडलेल्या मुद्देसुद मागण्यांना सरकारनेही मंजूरी दिली. यामध्ये गोपीनाथरावजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कष्टकरी शेतमजुरांचा समावेश, तसेच कापूस खरेदी मर्यादा ५ क्विंटलवरून थेट २३ क्विंटल प्रति हेक्टर वाढविण्याचा नि र्णय शासनाने घेतला आहेत. तसेच सिंदखेड राजा मतदार संघातील ग्रामीण भागासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, कायंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

आमदार मनोज कायंदे यांनी शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा विधानसभेत आक्रमकपणे मांडत शासनाने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी ठाम मागणी केली. “गेल्या दहा वर्षांपासून कर्मचारी अन्याय सहन करत आहेत. तांत्रिक कारणांच्या नावाखाली त्यांना हक्कांपासून वंचित ठेवणे चुकीचे आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर थेट बोट ठेवले.

आमदार कायंदे म्हणाले की, जाहिरात किंवा रुजू होण्याच्या तारखांमुळे कर्मचाऱ्यांना लाभ नाकारला जात असेल, तर तो अन्याय तातडीने दूर झाला पाहिजे. तारीख एकच असताना वेगवेगळा न्याय कसा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, धोबी समाजासह सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा उल्लेख करत, त्यांच्या उपोषण व आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता तातडीने न्याय देण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशनात आमदार कायंदेंनी मांडलेल्या या भूमिकेचे कर्मचारी वर्गातून स्वागत होत आहे.

दरम्यान, त्यांनी कृषी सोलार पंपामुळे बाधित शेतकऱ्यांना नियमित वीज कनेक्शन, मातोश्री पांदण शेतरस्ता योजनेतील जाचक अटी शिथिल करून कामांना गती, अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींसाठी तात्काळ आर्थिक मदत व नुकसानग्रस्त घरांना प्रधानमंत्री आवास योजनेत प्राधान्य देण्याची मागणीही सभागृहात ठामपणे मांडली.

वन्य प्राण्यांमुळे शेतमालाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी वनक्षेत्राला कुंपण घालण्याची मागणी करत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला जाब विचारला.उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांसाठीही ठाम भूमिका घेत, सर्व कर्मचाऱ्यांची सेवा तात्काळ कायम करावी, कॅडरनिहाय मानधन थेट खात्यात जमा करावे, केंद्राची Human Resource Policy तात्काळ लागू करावी, अशा स्पष्ट मागण्या त्यांनी केल्या.शिक्षकांना मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास राहण्याची अट शिथिल करण्याची मागणी आमदार मनोज कायंदे यांनी केली. तसेच पवित्र पोर्टलवरील TET भरती प्रक्रिया, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ तसेच शालार्थ संघर्ष समिती, नागपूर या संघटनांच्या संदर्भातील विविध मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंतीही कायंदे यांनी विधानसभेत केली.

यासोबतच गोपीनाथरावजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कष्टकरी शेतमजुरांचा समावेश, तसेच कापूस खरेदी मर्यादा ५ क्विंटलवरून थेट २३ क्विंटल प्रति एकर वाढविण्याचा निर्णय झाल्याची माहिती देत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सिंदखेड राजा मतदारसंघातील ग्रामीण भागासाठी २०० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार कायंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व महायुती सरकारचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top