Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Missing child : हरवलेल्या मुलाचा १२ तासातच लावला शाेध, आई वडीलांच्या दिले ताब्यात

Missing child : बार्शीटाकळीतील १५ वर्षीय मुलगा घरातून ट्युशनला जातो असे सांगून निघाल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या १२ तासांत मुलाचा सुखरूप शोध लागला असून त्याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Missing child
काेचींग क्लास घरून निघाल्यावर परतलाच नव्हता
अकोला : बार्शीटाकळीतील १५ वर्षीय मुलगा घरातून ट्युशनला जातो असे सांगून निघाल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या १२ तासांत मुलाचा सुखरूप शोध लागला असून त्याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
फिर्यादी नरेंद्र महादेव आनलसहि (वय ४३, रा. रामनगर, बार्शीटाकळी, जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा मयुरेश (वय १५) हा दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता “अजय सिरसाठ सरांच्या ट्युशनसाठी खडकी, अकोला येथे जातो” असे सांगून घरातून निघाला होता. तो संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने पालकांनी ट्युशन शिक्षकांशी संपर्क साधला. शिक्षकांनी सांगितले की, ट्युशन संपल्यानंतर मुलाला कौलखेड येथून ऑटोमध्ये बसवून दिले होते.मात्र मुलगा घरी न पोहोचल्याने पालकांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानक तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. अखेर पोलिसांत अज्ञात इसमाकडून मुलगा पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास अधिकारी ए.एस.आय. दिनकर धुरंधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्पर शोध मोहीम सुरू केली. पोलिस स्टाफने शहर आणि परिसरात गस्त वाढवत असताना मयुरेश हा अनुप महापुरे यांना आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना व मुलाचे पालकांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी मुलाला सुखरूपपणे आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
 पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, तसेच पोलीस निरीक्षक मनोज केदारे (पोस्टे खदान, अकोला) यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. दिनकर धुरंधर, पो.हवा. संतोष गावंडे, अमरसिंग पवार, पो.शि. भुषण मोरे, अभिमन्यु सदाशिव, वैभव कस्तुरे आणि स्वप्नील वानखडे यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top