Mahabreaking

[breaking_news]

Paryavaran Mitra Mandal:  वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण मित्र मंडळाचा उपक्रम 

Paryavaran Mitra Mandal: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी पर्यावरण मित्र मंडळ, बुलडाणा यांच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

Paryavaran Mitra Mandal

आंबा, पिंपळ, जांभूळ, करंजाच्या रोपांचे लागवड; बुलडाण्यात पर्यावरण दिन साजरा

बुलढाणा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी पर्यावरण मित्र मंडळ, बुलडाणा यांच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शहरातील बालाजी मंदिर परिसरात आंबा, पिंपळ, जांभूळ, करंज आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पर्यावरण मित्र मंडळाचे प्रदीप डांगे, दीपक पाटील, जीवन जाधव, अनु माकोने, खंडारे फौजी, कल्पना माने, प्रिती डांगे, विधी राठी, सार्थक डांगे, रवी पाटील आणि जयंत दलाल यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाकोडे, वनपाल रघुनाथ नेवरे, वनपाल प्रफुल मोरे, हैप्पी रिव्हर कम्युनिटीचे मांटे साहेब व गवली साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जीजाताई राठोड, शुभांगी भोंडे, सुरेखा खोत, अनिता कापरे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदविला.यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि हरित भविष्याचा संदेश देत जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top