Mahabreaking

[breaking_news]

Medical bills : वैद्यकीय देयके प्रलंबित; शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी

Medical bills : बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या आजारपणासाठी मोठा वैद्यकीय खर्च करून, नियमांनुसार आवश्यक कागदपत्रांसह वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी बिले संबंधित विभागाकडे सादर केली आहेत. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपचारासाठी खर्च केलेली रक्कम वेळेत परत मिळत नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Medical

   उपचारासाठी लाखोंचा खर्च, प्रतिपूर्तीसाठी प्रतीक्षाच; वैद्यकीय बिले तातडीने निकाली काढण्याची मागणी

  बबन फेपाळे

रुईखेड मयंबा : बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या आजारपणासाठी मोठा वैद्यकीय खर्च करून, नियमांनुसार आवश्यक कागदपत्रांसह वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी बिले संबंधित विभागाकडे सादर केली आहेत. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपचारासाठी खर्च केलेली रक्कम वेळेत परत मिळत नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

शासकीय तसेच अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आजारपणाच्या काळात उपचारासाठी मोठा खर्च करावा लागतो. गंभीर आजार, शस्त्रक्रिया किंवा रुग्णालयातील उपचारासाठी अनेकदा लाखो रुपयांचा खर्च होतो. अशावेळी कर्मचारी प्रथम आपल्या परीने उपचाराचा खर्च करतात आणि त्यानंतर वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आवश्यक कागदपत्रांसह बिले संबंधित विभागाकडे सादर करतात.

मात्र, बिले सादर केल्यानंतरही त्यांच्या मंजुरीची तसेच प्रतिपूर्तीची प्रक्रिया संथ गतीने होत असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे उपचारासाठी आधीच खर्च केलेली मोठी रक्कम बराच काळ अडकून पडते. परिणामी घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळताना कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण होत आहे.

कार्यालयीन चकरा वाढल्या

प्रलंबित वैद्यकीय देयकांची माहिती घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार कार्यालयात जावे लागत असल्याचे चित्र आहे. बिले कोणत्या टप्प्यावर आहेत, त्यांना मंजुरी कधी मिळणार आणि प्रतिपूर्तीची रक्कम कधी खात्यावर जमा होणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

उपचारानंतरही आर्थिक विवंचना

आजारपणातून सावरण्याच्या काळातच वैद्यकीय खर्चाचा आर्थिक भार कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. वैद्यकीय देयकांची रक्कम वेळेत मिळणे आवश्यक असून, त्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागू नये, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

प्रलंबित बिले तातडीने निकाली काढण्याची मागणी

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित वैद्यकीय देयके तातडीने मंजूर करून त्यांची प्रतिपूर्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसेच भविष्यात वैद्यकीय प्रतिपूर्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि निश्चित कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच या प्रश्नासाठी शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी आवाज उठवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

“कोणतेही वैद्यकीय देयक प्रलंबित नाही. १०० बिलांचा लॉट पूर्ण झाल्यानंतर आम्ही तो मंजुरीसाठी पाठवतो.”

— अविनाश निवालकर, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी, माध्यमिक विभाग, बुलढाणा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top