Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Massive fire breaks :अडगावमध्ये भीषण आग; बालिकेसह तिघांचा होरपळून मृत्यू

Massive fire breaks : येथे गुरुवारी रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये माय-लेकासह शिक्षणासाठी आलेल्या आठ वर्षीय बालिकेचा समावेश आहे.

Massive fire breaks

अडगाव बु  : येथे गुरुवारी रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये माय-लेकासह शिक्षणासाठी आलेल्या आठ वर्षीय बालिकेचा समावेश आहे.

अडगाव येथील बाजारपुरा भागात अनिल चव्हाण (वय २२) हे आपल्या कुटुंबासह शेख इब्राहीम यांच्या घरात भाड्याने राहत होते. गुरुवारी रात्री घरातील गॅस सुरू असताना अचानक सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. घरात डिझेलचा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले.

आगीची तीव्रता इतकी होती की घरातील साहित्य आणि जीव वाचविण्याची कोणालाही संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत अनिल उकर्डा चव्हाण (वय २२) आणि त्यांची भाची स्वरा सोळंके (वय ८) यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. अनिल यांची आई रत्नाबाई उकर्डा चव्हाण (वय ४८) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मृत स्वरा ही शिक्षणासाठी आजोळी आली होती. ती अमरावती जिल्ह्यातील टाकरखेड संभू येथील रहिवासी असल्याने तिच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, तहसीलदार महेश रामगुंडे, ठाणेदार गजानन राठोड, उपनिरीक्षक गिलबिले तसेच महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस विभागाच्या फॉरेन्सिक पथकाने पंचनामा करून स्फोटाचे तांत्रिक कारणाचा शोध सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top