Mahabreaking

[breaking_news]

Samarth Pharmacy students :समर्थ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना GPAT यशाचा ‘मंत्र’; विशेष कार्यशाळेतून परीक्षेचे मार्गदर्शन

Samarth Pharmacy students : श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, सचिव श्री. सतीश कायंदे तसेच सहसचिव व आमदार श्री. मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे.

Samarth Pharmacy students

 GPATच्या तयारीला समर्थ फार्मसीतून बळ; एकदिवसीय विशेष कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, सचिव श्री. सतीश कायंदे तसेच सहसचिव व आमदार श्री. मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बी. फार्मसी तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी GPAT परीक्षेच्या तयारीसंदर्भात एकदिवसीय विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. प्रफुल ताठे यांच्या सूचनेनुसार तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.

‘फंडामेंटल फार्मसी’चे तज्ज्ञ मार्गदर्शक सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना GPAT परीक्षेच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. परीक्षेला सामोरे जाताना विविध विषयांचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, महत्त्वाचे घटक कोणते आहेत, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे समजून घ्यावे तसेच वेळेचे नियोजन कसे करावे, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सचिन जाधव यांची विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांच्या मार्गदर्शन कार्यशाळांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. GPAT परीक्षेच्या तयारीसाठी आयोजित या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

या कार्यशाळेच्या आयोजनासाठी GPAT समन्वयक डॉ. पवन नारखेडे व प्रा. शकुंतला कव्हले यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी प्राचार्य डॉ. प्रफुल ताठे यांनी मार्गदर्शक सचिन जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर चराटे यांनी केले, तर प्रा. देवानंद डोंगरे यांनी आभार मानले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विकास काकड, वैभव तळेकर, जनार्दनपुरी, शरद नागरे, अक्षय घुगे, अक्षय सानप, अजय टाले, अजय मुंडे तसेच प्रतीक गुप्ता यांनी परिश्रम घेतले.

समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना GPATसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी सातत्याने तज्ज्ञांचे मार्गदर्शन व अभ्यासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या यशाला निश्चितच बळ मिळत आहे. महाविद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल पालकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top