Mahabreaking

[breaking_news]

MD Drugs Worth ₹13.80 Lakh Seized : अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई; १३.८० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

MD Drugs Worth ₹13.80 Lakh Seized : अंमली पदार्थविरोधात अकोला पोलिसांनी धडक मोहिम सूरू केली आहे.  ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १३ लाख ८० हजार रुपयांच्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह एका आरोपीला गजाआड केले आहे.  सन २०२६ मधील ही पोलिसांची सर्वात मोठी कारवाई आहे.

MD Drugs Worth ₹13.80 Lakh Seized

नवीन बसस्थानकाजवळ एलसीबीची कारवाई; मुंबईतील आरोपी अटकेत

अकोला :  अंमली पदार्थविरोधात अकोला पोलिसांनी धडक मोहिम सूरू केली आहे.  ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १३ लाख ८० हजार रुपयांच्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह एका आरोपीला गजाआड केले आहे.  सन २०२६ मधील ही पोलिसांची सर्वात मोठी कारवाई आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी शासकीय पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान मोहम्मद शफीक मोहम्मद जहिर शेख (वय ३५, रा. मुंब्रा, जि. ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६८.४३ ग्रॅम एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन) ज्याची किंमत १३ लाख ६० हजार रुपये आहे, तसेच २० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजीद पठाण, गणेश पांडे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईने खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top