Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Operation Prahar: ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई : २५ गोवंशांना जीवनदान; ६ लाख १५ हजारांचा एवज जप्त

Operation Prahar:  जिल्ह्यात गोवंश तस्करी व अवैध कत्तलीविरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी मोठी कारवाई करत २५ गोवंश जातीच्या जनावरांना जीवनदान दिले आहे. या कारवाईत ₹६ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Operation Prahar

अकोला : जिल्ह्यात गोवंश तस्करी व अवैध कत्तलीविरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी मोठी कारवाई करत २५ गोवंश जातीच्या जनावरांना जीवनदान दिले आहे. या कारवाईत ₹६ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘ऑपरेशन प्रहार’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक API विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विष्णु बोडखे, पो.उपनि. माजिद खान पठाण व इतर पोलीस अमलदार खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना दुपारी २.३० वाजता पोळा चौक, अकोला येथे गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. या माहितीनुसार दहीहांडा वेस, खिडकीपुरा, अकोला येथील शेख सद्दाम शेख मेहबूब व मोबिन कुरेशी मोहसीन कुरेशी यांनी खिडकीपुरा मश्जिदसमोरील त्यांच्या ताब्यातील मोकळ्या जागेत गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवली असल्याचे निष्पन्न झाले.

ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक (स्थागुशा) शंकर शेळके यांना देण्यात आली. त्यानंतर प्र. सहायक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांच्या उपस्थितीत, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांच्या साक्षीने दुपारी ३.०० वाजता छापा टाकण्यात आला. छाप्यात २५ गोवंश जातीची जनावरे अत्यंत दयनीय, जखमी व अशक्त अवस्थेत आढळून आली. जनावरांना पाणी व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था नसून ती कत्तलीसाठीच ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची अंदाजे किंमत ₹६,१५,००० इतकी आहे. दरम्यान, आरोपींचा शोध घेतला असता ते त्यांच्या राहत्या घरी किंवा परिसरात मिळून आले नाहीत. तसेच जनावरांबाबत कोणतीही वैध कागदपत्रे उपलब्ध झाली नाहीत. पंचनामा करून सर्व २५ गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून त्यांच्या देखभाल, सुरक्षा व उपचारासाठी आदर्श गोसेवा केंद्र, ग्राम म्हैसपूर, अकोला येथे अटी-शर्तीवर सुपूर्द करण्यात आली आहेत. या प्रकरणी फरार आरोपी शेख सद्दाम शेख मेहबूब व मोबिन कुरेशी मोहसीन कुरेशी (दोन्ही रा. दहीहांडा वेस, खिडकीपुरा, अकोला) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ कलम ५, ५(क), ९, ९(अ), प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायदा १९६० कलम ११(ड) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३२९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी, प्र. सहायक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद, पोलीस निरीक्षक (स्थागुशा)  शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली API विजय चव्हाण, पो.उपनि. विष्णु बोडखे, हवालदार फिरोज खान, खुशाल नेमाडे, शेख हसन, अब्दुल माजिद, वसीमुद्दीन, किशोर सोनवणे, अमोल दीपके, स्वप्निल खेडकर, राज चंदेल, मोहम्मद अमीर, अभिषेक पाठक, आकाश मानकर, जी.पी.एस.आय. विनोद ठाकरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top