Mahabreaking

[breaking_news]

Jaykrishna Thokal : जयकृष्ण ठोकळ यांची अशासकीय बांधकाम कामगार समितीवर नियुक्ती

Jaykrishna Thokal : अकोला तालुका कृषी ‘आत्मा’ समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस जयकृष्ण ठोकळ यांची महाराष्ट्र शासनाच्या अशासकीय बांधकाम कामगार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे तालुक्यातील बांधकाम कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Jaykrishna Thokal

बोरगाव मंजू : अकोला तालुका कृषी ‘आत्मा’ समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस जयकृष्ण ठोकळ यांची महाराष्ट्र शासनाच्या अशासकीय बांधकाम कामगार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे तालुक्यातील बांधकाम कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. जयकृष्ण ठोकळ हे सामाजिक, कृषी व संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी यापूर्वीही विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

बांधकाम कामगारांच्या समस्या, त्यांच्या हक्कांसाठी शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोकळ यांची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

या नियुक्तीचे श्रेय खासदार अनुप धोत्रे तसेच अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांना देण्यात येत असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ही संधी मिळाल्याचे ठोकळ यांनी नमूद केले आहे. नियुक्तीनंतर त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top