Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Danish Raza : बाळापूरमध्ये मोठा अपघात; २४ वर्षीय दानिश रझाची मृत्यूशी झुंज  

Danish Raza : बाळापूर शहरात घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, मानवतेला हादरवून टाकणारी ही घटना प्रत्येक संवेदनशील मन हेलावून टाकणारी आहे. दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता, बाळापूर हायवे पुलावर अरब भाई यांच्या ढाब्यासमोर झालेल्या भीषण रस्ते अपघातात २४ वर्षीय मोहम्मद दानिश रझा गंभीर जखमी झाले.

Danish Raza

तातडीच्या आर्थिक मदतीचे कळकळीचे आवाहन

झाकीर अहमद

बाळापूर : बाळापूर शहरात घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, मानवतेला हादरवून टाकणारी ही घटना प्रत्येक संवेदनशील मन हेलावून टाकणारी आहे. दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता, बाळापूर हायवे पुलावर अरब भाई यांच्या ढाब्यासमोर झालेल्या भीषण रस्ते अपघातात २४ वर्षीय मोहम्मद दानिश रझा गंभीर जखमी झाले.

अपघात इतका भीषण होता की, दानिश रझा यांना रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते जीवन-मरणाच्या सीमारेषेवर झुंज देत असून, डॉक्टरांच्या मते त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. आज त्यांच्यावर आयकॉन रुग्णालयात मेंदूवरील अतिशय संवेदनशील शस्त्रक्रिया होणार असून, प्रत्येक क्षण कुटुंबासाठी प्राणघातक ठरत आहे.

आतापर्यंत उपचारासाठी सुमारे ३ लाख रुपयांहून अधिक खर्च झाला असून, त्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. पुढील शस्त्रक्रिया, आयसीयू उपचार आणि औषधोपचारांचा वाढता खर्च पाहता, हा भार पेलणे कुटुंबाच्या क्षमतेबाहेर गेले आहे.

मोहम्मद दानिश रझा हा साधा, प्रामाणिक आणि कष्टकरी युवक असून, तो आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होता. आई-वडिलांच्या डोळ्यातील स्वप्ने, कुटुंबाची आशा आणि उद्याचा आधार—आज तोच युवक रुग्णालयाच्या खाटेवर असहाय्य अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे. त्याचे जीवन आता समाजाच्या मानवी संवेदनशीलतेकडे आशेने पाहत आहे.

 

सहृदय नागरिकांना कळकळीचे आवाहन

या अत्यंत कठीण प्रसंगी बाळापूर, अकोला जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सक्षम नागरिक, व्यापारी बांधव, सामाजिक संस्था व संवेदनशील व्यक्तींनी पुढे येऊन मोहम्मद दानिश रझा यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी, अशी नम्र विनंती करण्यात येत आहे. आपली थोडीशी मदत एखाद्याचा श्वास वाचवू शकते, एका कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून रोखू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top