Mahabreaking

[breaking_news]

Maharashtra Police Boys Association : पातूर सार्वजनिक बागेच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक

Maharashtra Police Boys Association : शहरातील नगर परिषदेच्या अखत्यारीतील सार्वजनिक बागेची अवस्था दिवसेंदिवस जीर्ण व दुर्लक्षित होत असल्याने तिचे तातडीने नूतनीकरण करून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पातूर तालुका यांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष हिदायत खान रूम खान व उपाध्यक्ष अजय पाटील यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

Maharashtra Police Boys Association

 स्वच्छता, एलईडी, सीसीटीव्ही ते मुलांसाठी खेळणी; सार्वजनिक बागेच्या सर्वांगीण विकासाची मागणी

निशांत गवई

पातूर : शहरातील नगर परिषदेच्या अखत्यारीतील सार्वजनिक बागेची अवस्था दिवसेंदिवस जीर्ण व दुर्लक्षित होत असल्याने तिचे तातडीने नूतनीकरण करून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पातूर तालुका यांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष हिदायत खान रूम खान व उपाध्यक्ष अजय पाटील यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

add

निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बाग ही शहरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांसाठी विरंगुळा, व्यायाम आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, सध्या बागेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून परिसरात अस्वच्छता, मोडकळीस आलेली बाके, खराब झालेल्या पायवाटा, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि मुलांसाठी खेळण्यांचा अभाव असल्याने नागरिकांना बागेचा सुरक्षित व सुविधायुक्त वापर करता येत नाही.

संघटनेने बागेचे सर्वांगीण सुशोभीकरण करण्याची मागणी करत संपूर्ण परिसराची साफसफाई करून नियमित देखभाल करावी, नवीन झोपाळे, घसरगुंडी व इतर खेळणी बसवावीत, खराब बाकांच्या जागी नवीन बाके बसवावीत, पायवाटांवर पेव्हर ब्लॉक टाकून त्यांची दुरुस्ती करावी, तसेच आकर्षक फुलझाडे व शोभेच्या वृक्षांची लागवड करावी, अशी मागणी केली आहे.

याशिवाय बागेत पुरेशी एलईडी प्रकाशयोजना, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, कचरापेट्या, मजबूत कंपाऊंड व प्रवेशद्वार, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आणि मुलांसाठी सुरक्षित खेळण्याचा विभाग तयार करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. बागेची नियमित देखभाल करण्यासाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त करावेत, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या सुविधा उपलब्ध झाल्यास सार्वजनिक बाग पुन्हा एकदा नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, शहराच्या सौंदर्यात भर पडेल, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल आणि महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांना सुरक्षित, स्वच्छ व आनंददायी वातावरण उपलब्ध होईल, असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पातूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत, उपाध्यक्ष अविनाश पोहरे, सचिव पवन तांबे, प्रसिद्धी प्रमुख आशिष शेगोकार यांच्यासह सम्राट खंडारे, किशोर बागडे, चेतन निमकंडे, योगेश बांगर, रोहित कावळे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top