Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

the Khadse couple’s : सुरांनी न्हालेला जिजाऊ जन्मोत्सव; खडसे दांपत्याच्या गायनाने जिंकली हजारोंची मने

the Khadse couple’s : छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ व राजमाता जिजाऊंचे मातृतीर्थ म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजामध्ये दरवर्षी भक्तिभावाने साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव यंदा सुरांच्या मंगल नादाने अधिकच भावसमृद्ध झाला. उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे व त्यांच्या पत्नी डॉ. नीता खडसे यांच्या सुमधुर गायनाने हा उत्सव अविस्मरणीय ठरला.

the Khadse

प्रा. संजय खडसे व डॉ. नीता खडसे यांच्या सुमधुर स्वरांनी सिंदखेड राजा भारावला

गजानन भालेकर 

सिंदखेड राजा : छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ व राजमाता जिजाऊंचे मातृतीर्थ म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजामध्ये दरवर्षी भक्तिभावाने साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव यंदा सुरांच्या मंगल नादाने अधिकच भावसमृद्ध झाला. उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे व त्यांच्या पत्नी डॉ. नीता खडसे यांच्या सुमधुर गायनाने हा उत्सव अविस्मरणीय ठरला.

दरवर्षी १२ जानेवारी रोजी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी, भाविक व पर्यटक सिंदखेड राजात दाखल होतात. गेल्या काही वर्षांपासून तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून येथे ‘जिजाऊ गाथा’ हा भव्य सांस्कृतिक उपक्रम राबविला जात असून, जिजाऊंच्या जीवनकार्याचा, त्यागाचा व संस्कारांचा प्रभावी सांस्कृतिक आविष्कार यातून सादर केला जातो.

यावर्षीच्या कार्यक्रमात प्रा. संजय खडसे व डॉ. नीता खडसे यांनी
छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा,
‘शिवनेरी गडावर बांधल तोरण’,
‘भूमी महाराष्ट्राची झाली पावन’,
‘जो बाळा जो रे जो’,
‘जाधवाची लेक अन् सून भोसल्याची’,
‘राजमाता विरमाता माय शिवबाजी’,
‘दोनच राजे इथे गाजले’,
‘कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यात’
ही भावपूर्ण गीते सादर केली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.

प्रशासनातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच अंगी असलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्यास त्याचा समाजावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो, याचे जिवंत उदाहरण खडसे दांपत्याने सादर केले. त्यांच्या स्वरांतून जिजाऊंचे मातृत्व, राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा आणि शिवसंस्कारांचा गहिरा भाव प्रभावीपणे उमटला.

लोकशाहीतील शासन व प्रशासन ही केवळ व्यवस्थापनाची साधने नसून, त्यांना संवेदनशील व सुसंस्कृत नेतृत्व लाभल्यास सामाजिक व सांस्कृतिक विकासालाही दिशा मिळते. याच भावनेतून प्रा. संजय खडसे यांनी प्रशासनाच्या माध्यमातून जिजाऊ जन्मोत्सव अधिक अर्थपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमस्थळी उपस्थित हजारो नागरिकांनी खडसे दांपत्याच्या गायनाला भरभरून दाद दिली. “प्रशासनातील अधिकारी केवळ कागदपत्रांपुरते मर्यादित नसून समाजाच्या सांस्कृतिक प्रवाहातही सक्रिय सहभाग घेऊ शकतात,” असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top