Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Ayushman Bharat :आयुष्यमान भारतमध्ये नियुक्तीचे आमीष, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाखाने फसवणूक

Ayushman Bharat :नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्र देऊन बुलढाणा येथील सेवानिवृत्त नागरिकाची ऑनलाइन पद्धतीने दीड लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अकोला येथील युवकाविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सुंदरखेड येथील रहिवासी विलास हरीभाऊ मानवतकर (वय ६०, व्यवसाय : सेवानिवृत्त) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंकीत (अनिकेत) किरण मोहोड, रा. अकोला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ayushman Bharat,

 अकोल्यातील युवकावर बुलढाण्यात गुन्हा दाखल;बनावट नियुक्तीपत्रही दिले

बुलढाणा : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्र देऊन बुलढाणा येथील सेवानिवृत्त नागरिकाची ऑनलाइन पद्धतीने दीड लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अकोला येथील युवकाविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सुंदरखेड येथील रहिवासी विलास हरीभाऊ मानवतकर (वय ६०, व्यवसाय : सेवानिवृत्त) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंकीत (अनिकेत) किरण मोहोड, रा. अकोला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार , मार्च २०२४ मध्ये आरोपी अंकीत मोहोड याने मानवतकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून ‘आयुष्यमान भारत मिशन ऑरगनायझेशन’ अंतर्गत खाजगी तत्त्वावर आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करून त्याने मानवतकर यांचा मुलगा अमित याची शैक्षणिक कागदपत्रे मागवून घेतली.

नोकरी मिळवून देण्यासाठी सुरुवातीला दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार मानवतकर यांनी फोन-पेच्या माध्यमातून ८ व १५ मार्च २०२४ रोजी टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख ५० हजार रुपये आरोपीच्या खात्यावर पाठविले.

यानंतर आरोपीने २७ मार्च २०२४ रोजी ‘आयुष्यमान भारत मिशन ऑरगनायझेशन’च्या नावाचे नियुक्तीपत्र दिले. मात्र संबंधित कार्यालयात चौकशी केली असता हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रक्कम परत मागितली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा केला आणि अखेर संपर्क तोडला.या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३१६ (२) व ३१८ (४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत धारकरी करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top