Mahabreaking

[breaking_news]

Lok Sabha adjourned :गोंधळात लोकसभेचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब;विरोधी पक्षाच्या खासदारांची घोषणाबाजी

Lok Sabha adjourned : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी लोकसभा कामकाज गोंधळात पार पडले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत वेलमध्ये धाव घेतल्याने अवघ्या काही मिनिटांतच कामकाज विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले.

Lok Sabha adjourned

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी लोकसभा कामकाज गोंधळात पार पडले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत वेलमध्ये धाव घेतल्याने अवघ्या काही मिनिटांतच कामकाज विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी तीव्र घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने सभापती संध्या राय यांनी लोकसभा प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केली. दुपारी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर शिक्षण व कायदा मंत्रालयाशी संबंधित काही विधेयके सादर करण्यात आली; मात्र त्यानंतर संपूर्ण सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत होत असून पहिल्या टप्प्यानंतर २३ दिवसांची विश्रांती राहणार आहे. दुसरा टप्पा ९ मार्चपासून सुरू होऊन २ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सत्ता मिळवण्यासाठी देशाच्या फाळणीसारख्या विचारांना चालना दिल्याचा आरोप केला. या वक्तव्यामुळे संसदीय राजकारणातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top