Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Leopard :देऊळगावात बिबट्याचा धुमाकूळ; बकरी फस्त

Leopard :पातूर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या देऊळगाव येथे बिबट्याने बकरी फस्त केल्याची घटना शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी घडली. या घटनेत शेतकरी काशीराम उपर्वट यांची एक मोठी बकरी बिबट्याकडून ठार करण्यात आल्याने त्यांचे अंदाजे १२ ते १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Leopard

शेतकऱ्याचे १२ ते १५ हजारांचे आर्थिक नुकसान

राहुल सोनोने 

दिग्रस बू.: पातूर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या देऊळगाव येथे बिबट्याने बकरी फस्त केल्याची घटना शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी घडली. या घटनेत शेतकरी काशीराम उपर्वट यांची एक मोठी बकरी बिबट्याकडून ठार करण्यात आल्याने त्यांचे अंदाजे १२ ते १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

गेल्या महिन्याभरापासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत असून, त्यामुळे शेतकरी व पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शुक्रवारी बकऱ्या चरण्यासाठी गेलेल्या असताना बिबट्याने अचानक हल्ला करत एका मोठ्या बकरीला उचलून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.या गंभीर घटनेची पातूर वनविभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गातून होत आहे.दरम्यान, या घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली असून पुढील तपास पातूर वनविभागाकडून सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top