Mahabreaking

[breaking_news]

woman from Pangarkhed goes missing :शिक्षणासाठी जाते म्हणत घराबाहेर पडली;पांगरखेड येथील २० वर्षीय युवती बेपत्ता

woman from Pangarkhed goes missing :डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पांगरखेड गावातील २० वर्षीय युवती शिक्षणासाठी हिवरा आश्रमला जाते असे सांगून घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्याने अखेर तिच्या वडिलांनी १३ मार्च रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

woman from Pangarkhed goes missing
हिवरा आश्रमला गेल्याचे सांगून निघाली; १४ फेब्रुवारीपासून वसतिगृहातही अनुपस्थित

डोणगाव :  डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पांगरखेड गावातील २० वर्षीय युवती शिक्षणासाठी हिवरा आश्रमला जाते असे सांगून घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्याने अखेर तिच्या वडिलांनी १३ मार्च रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास मधुकर नालींदे (रा. पांगरखेड) यांची २० वर्षीय मुलगी २७ फेब्रुवारी रोजी हिवरा आश्रम येथे शिक्षणासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला फोन उचलला गेला नाही आणि काही वेळानंतर फोन बंद येऊ लागला.

यानंतर कुटुंबीयांनी हिवरा आश्रम येथील वसतिगृहात जाऊन चौकशी केली, मात्र संबंधित मुलगी आजारी असल्याचा अर्ज देऊन १४ फेब्रुवारी २०२६ पासून वसतिगृहातही आलेली नसल्याचे तेथील प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर तिच्या मैत्रिणी, वर्गमित्र, नातेवाईक तसेच परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला; मात्र ती आढळून आली नाही. बेपत्ता युवतीचे वर्णन असे – रंग गोरा, उंची सुमारे पाच फूट, बांधा सडपातळ, केस काळे आहेत. अंगात पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात काळ्या रंगाची सँडल, तसेच दोन्ही कानात सोन्याच्या रिंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीच्या अहवालावरून डोणगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून युवतीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top