Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Laborer attacked :काम सोडल्याच्या कारणावरून मजुरावर लोखंडी गजाने हल्ला;  तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Laborer attacked : काम सोडून दुसऱ्या ठिकाणी कामाला गेल्याच्या कारणावरून एका मजुरावर लोखंडी गज व लाकडी काठीने हल्ला केल्याची घटना शहरातील सिव्हील कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Laborer attacked
देऊळगाव राजा : काम सोडून दुसऱ्या ठिकाणी कामाला गेल्याच्या कारणावरून एका मजुरावर लोखंडी गज व लाकडी काठीने हल्ला केल्याची घटना शहरातील सिव्हील कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर मोहनराव गायकवाड (वय ३८, रा. माळी वेस, जि. बीड, सध्या रा. सिव्हील कॉलनी, स्वामी समर्थ मंदिराजवळ, देऊळगाव राजा) हे मजुरी व घरबांधकामाचे काम करतात. गुरुवारी (दि. १२ मार्च) रात्री सुमारे ९.२० वाजता ते सिव्हील कॉलनीतील फीरोज मुनीर पठाण यांच्या बांधकाम साईटवर जेवण करून बसले होते.
दरम्यान, मुस्ताक कादरी, मुजोददीन इनामदार व जुवेर (सर्व रा. इस्लामपुरा, ता. जि. बीड) हे तेथे आले. “आमच्या साईटवरील काम सोडून येथे का आला?” असा जाब विचारत त्यांनी अमर गायकवाड यांना लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण केली. या हल्ल्यात गायकवाड यांच्या डाव्या हातावर, पाठीवर व गळ्यावर मार लागून ते जखमी झाले. तसेच “आमच्या कामावर परत आला नाहीस तर पुन्हा मारू” अशी धमकी देत शिवीगाळही केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या घटनेप्रकरणी अमर गायकवाड यांच्या तोंडी फिर्याद व वैद्यकीय अहवालाच्या आधारे देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायमी गुन्हा क्र. १०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 352, 351(2), 351(3) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलीस कर्मचारी सुषमा उईके यांनी दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप करीत आहेत. घटनेनंतर पोलिस उपनिरीक्षक नितीन मिंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top