Kiran Tai Wagh : भारत सरकार नोंदणीकृत असून ग्राहकांचे न्याय्य हक्क व मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा महिला विभागाच्या सचिवपदी देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या सक्रिय सदस्या पत्रकार किरणताई वाघ यांची निवड करण्यात आली आहे.

देऊळगाव राजा : भारत सरकार नोंदणीकृत तथा ग्राहकांचे न्याय्य हक्क व मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा महिला विभागाच्या सचिवपदी देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या सक्रिय सदस्या पत्रकार किरणताई वाघ यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे व राष्ट्रीय सचिव अविनाश झोटिंग यांच्या हस्ते दि. १ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना किरणताई वाघ यांनी सांगितले की, ग्राहकांच्या अडीअडचणी, त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे, अशा नागरिकांनी निर्भयपणे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
त्यांच्या निवडीबद्दल विदर्भ अध्यक्ष सचिन खंडारे, विदर्भ सचिव डॉ. गंगाराम उबाळे, प्रदेश कार्याध्यक्ष सुनील अंभोरे, जिल्हाध्यक्ष चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष विजेता साळवे यांच्यासह समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.

