Mahabreaking

[breaking_news]

A female leopard died :बाळापूर–वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट ठार

A female leopard died : बाळापूर ते वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार, दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. मृत बिबट्याचे वय साधारण दोन ते अडीच वर्षे असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

leopard died

वनविभागाकडून पंचनामा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

वाडेगाव : बाळापूर ते वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार, दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. मृत बिबट्याचे वय साधारण दोन ते अडीच वर्षे असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

सदर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अकोला वनविभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक पवन जाधव व आर.एफ.ओ. विश्वास थोरात यांच्या आदेशानुसार वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

या पथकात वनपाल गजानन गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनरक्षक एन. एन. सावळे, राम काकडे, यशपाल इंगोले व तुषार अवारे यांचा समावेश होता. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आढळून येत होता. त्या पार्श्वभूमीवर अकोला वनविभागाने प्रसारमाध्यमांद्वारे तसेच गावोगावी जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, रस्ते ओलांडताना वन्यजीवांना वाहनांच्या वेगाचा अंदाज येत नसल्याने अशा अपघातांची शक्यता वाढत असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

या घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच बिबट्यासह इतर वन्यप्राणी आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top