Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Journalist Day :देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

Journalist Day : मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे मंगळवार, दिनांक ६ जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अर्थात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

पत्रकारांचा सन्मान; आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

देऊळगाव राजा : मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे मंगळवार, दिनांक ६ जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अर्थात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके होते. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकारांचा शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवर पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला शब्दसुमनांनी अभिवादन केले. तसेच ज्येष्ठ पत्रकार सुरज गुप्ता व प्रा. अशोक डोईफोडे यांनी पत्रकारितेत ३६ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अध्यक्ष गजानन तिडके यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या सन्मान सोहळ्याला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके, कार्याध्यक्ष गणेश डोके, उपाध्यक्ष मंगेश तिडके, सचिव सुरज गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. अशोक डोईफोडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक जोशी, शिवाजी वाघ, संतोष जाधव, प्रभाकर मांटे, मुबारक शहा, मुन्ना ठाकूर, राजेश खांडेभराड तसेच महिला पत्रकार किरण वाघ, उषा डोंगरे, सन्माननीय सदस्य ॲड. आदिल पठाण, संतोष वासुंबे, शेख कादिर, परमेश्वर खांडेभराड, अमोल हरणे, दत्ता हांडे, इरफान भाई, बस्ती सर, राजूभाऊ डोंगरे, राजेश पंडित, प्रविण काकडे, गायिका प्रित पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव सुरज गुप्ता यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top