Mahabreaking

[breaking_news]

Joint operation :अकोल्यात बेकायदेशीर गर्भपात औषध विक्रीवर संयुक्त कारवाई; एकाला अटक

Joint operation : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) अकोला आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत मच्छींद्र नगर, छोटी उमरी परिसरात बेकायदेशीररित्या गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. या कारवाईत गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा परवान्याविना साठा जप्त करण्यात आला आहे.

Joint operation

 परवान्याविना गर्भपात औषधांचा साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखा व अन्न-औषध प्रशासनाची धडक

अकोला  : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) अकोला आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत मच्छींद्र नगर, छोटी उमरी परिसरात बेकायदेशीररित्या गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. या कारवाईत गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा परवान्याविना साठा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हरीदास रामदास डामरे हा डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या Termipil Kit आणि Gestapro Tablets या औषधांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिल माणिकराव यांच्या समन्वयाने कारवाईसाठी रवाना झाले.

पथकाने आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला असता गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा आढळून आला. तपासादरम्यान संबंधित व्यक्तीकडे औषधांची खरेदी, साठवणूक किंवा विक्री करण्यासाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या औषधांची किंमत सुमारे ४ हजार ९१४ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक तपासात आरोपी ही औषधे गरजूंना अधिक दराने विकत असल्याची माहिती समोर आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की, ही औषधे डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करण्यास कायद्याने मनाई आहे. तसेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या निर्देशांनुसार अशा औषधांचा वापर केवळ नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच केला जाऊ शकतो. त्यामुळे या औषधांचा बेकायदेशीर वापर झाला असण्याच्या शक्यतेनेही तपास सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी हरीदास रामदास डामरे (रा. मच्छींद्र नगर, छोटी उमरी, अकोला) याच्याविरुद्ध सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिव्हिल लाईन्स पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. अनिल माणिकराव, पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top