Mahabreaking

[breaking_news]

Sindkhed Raja Tehsil :सिंदखेडराजा तहसील कार्यालयात जनजातीय गौरव सेवा शिबिर उत्साहात; लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

Sindkhed Raja Tehsil : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयात १६ नोव्हेंबर २०२६ रोजी जनजातीय गौरव सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. जनजातीय समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना आवश्यक शासकीय सेवा उपलब्ध करून देणे तसेच विविध प्रमाणपत्रांच्या माध्यमातून त्यांची शासकीय कामे सुलभ करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

Sindkhed Raja

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय बांधवांसाठी सेवा शिबिर; शासकीय योजनांचा लाभ देण्याचा पुढाकार

गजानन तिडके

सिंदखेडराजा : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयात १६ नोव्हेंबर २०२६ रोजी जनजातीय गौरव सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. जनजातीय समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना आवश्यक शासकीय सेवा उपलब्ध करून देणे तसेच विविध प्रमाणपत्रांच्या माध्यमातून त्यांची शासकीय कामे सुलभ करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या शिबिरादरम्यान पात्र लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये शालिक टेकाम (सेवानिवृत्त), गणेश ठाकूर (सेवानिवृत्त), सोनाली पवार, मुन्ना पवार, सुधीर पवार आणि प्रदीप ठाकूर यांचा समावेश होता. शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाला निवासी नायब तहसीलदार संदीप बंगाळे, महसूल संघटनेचे अध्यक्ष संजय सोनुने, सेतू लिपिक प्रशांत हजारे, निरीक्षण अधिकारी जी. के. खरात, रोकडे मॅडम, पडघान मॅडम, जायभाये मॅडम, गणेश नागरे, गांजरे, सौरव आणि शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी गणेश देशमुख, हिरे यांच्यासह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी सेतू लिपिक संजय सोनुने, उमेश चव्हाण, प्रकाश सोनुने, जयश्री वाघमारे तसेच महाईसेवाधारकांनी विशेष मेहनत घेतली. नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत मिळाव्यात, त्यांची कागदपत्रांशी संबंधित कामे मार्गी लागावीत आणि शासनाच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

भगवान बिरसा मुंडा यांनी जनजातीय समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्याचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्यांच्या महान कार्याला अभिवादन करून उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचा संकल्प केला.

जनजातीय समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. महसूल विभागाच्या या उपक्रमातून जनजातीय बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top