Independence Day : स्व. जे. डी. भुतडा कलानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कारेगाव फाटा येथे ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

देशभक्तीपर गीत, नृत्य अन् नाटिकेने रंगला स्वातंत्र्य दिन सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
भागवत चव्हाण
कारेगाव : स्व. जे. डी. भुतडा कलानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कारेगाव फाटा येथे ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीरामजी भुतडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी वायाळ (इयत्ता १२वी) हिने केले, तर आभार प्रदर्शन मनोजकुमार भुतडा सर यांनी मानले.
यावेळी विलास महाराज गायकवाड, कचरू इंगळे, पत्रकार भागवत चव्हाण आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भाषणे, देशभक्तीपर गीते, नृत्य तसेच ‘विकसित भारत २०४७’ ही भावस्पर्शी नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
इयत्ता दहावीमध्ये उत्कृष्ट गुण संपादन करणाऱ्या योगेश बाजड याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लताताई शिंदे यांच्या वतीने १,१०० रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त सहाय्यक शिक्षक श्री. राहुल अंभोरे यांनी आयोजित केलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक इश्वरी काळूसे, द्वितीय क्रमांक शुभांगी काळूसे आणि तृतीय क्रमांक श्रावणी बुरकुल हिने मिळविला. माध्यमिक गटातून कु. वैष्णवी सानप (इयत्ता १२वी) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
‘विकसित भारत २०४७’ या नाटिकेसाठी पालक श्री. श्रीराम मुळे यांनी १,१०० रुपयांची प्रोत्साहनपर भेट दिली. तसेच इयत्ता १२वीत प्रथम आलेल्या पल्लवी जाधव हिचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पालकांनीही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत भेटी दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी लताताई शिंदे, कमलताई डोंगरे, जयश्रीताई कायंदे, पुरुषोत्तम वायाळ, संतोष सानप, अक्षय वानखेडे, देविदास काळूशे, गणेश चव्हाण, विश्वनाथ केंधळे, मोतिराम गायकवाड, गजानन येवले, ग्रामपंचायत सदस्य बोखारे, श्रीराम मुळे, अनंता शिंदे, संतोष चेके, अवसरमोल, दहातोंडे, सोनाली सिरसाट, योगेश गायकवाड यांच्यासह मान्यवर आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. मोठ्या संख्येने उपस्थित पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संस्मरणीय ठरला.

