Mahabreaking

[breaking_news]

Bangladesh :बांग्लादेशात मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ; युनूस यांच्याविरोधात चौकशी आयोगाची शक्यता

Bangladesh : शेख हसीना सरकारच्या तख्तापलटनंतर स्थापन झालेल्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमधील मंत्र्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. सरकारप्रमुख मोहम्मद युनूस यांच्या मालमत्तेत गेल्या एका वर्षात सुमारे ११ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती साडेबारा कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यात सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

Bangladesh

ढाका : शेख हसीना सरकारच्या तख्तापलटनंतर स्थापन झालेल्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमधील मंत्र्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. सरकारप्रमुख मोहम्मद युनूस यांच्या मालमत्तेत गेल्या एका वर्षात सुमारे ११ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती साडेबारा कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यात सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

अंतरिम सरकारमधील अव्वल चार मंत्र्यांमध्ये सर्वाधिक संपत्तीवाढ युनूस यांचीच झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर गृहनिर्माण मंत्री अदिलुर रहमान यांच्या संपत्तीत सुमारे १ कोटी २३ लाख रुपयांची वाढ झाली आहे. युनूस यांच्या मंत्रिमंडळातील २१ पैकी १८ मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचेही समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवे पंतप्रधान तारिक रहमान मंत्र्यांच्या वाढलेल्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करू शकतात.

दरम्यान, युनूस पुन्हा एकदा पॅरिस येथे स्थायिक होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. बांग्लादेशचे एकमेव नोबेल पारितोषिक विजेते म्हणून त्यांची ओळख आहे. मायक्रो फायनान्स क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या युनूस यांच्यावर शेख हसीना यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले होते; मात्र स्वतःचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते प्रकरणे मागे घेण्यात आली.

आयटी मंत्री फैज नेदरलँड्सला परतले

युनूस सरकारमध्ये आयटी मंत्री राहिलेले फैज अहमद तैयब, तारिक रहमान यांच्या विजयांनंतर पुन्हा नेदरलँड्स येथे परतल्याचे समजते. त्यांच्या कार्यकाळात आयटी क्षेत्रात परदेशी कंपन्यांच्या बाजूने घेतलेल्या काही निर्णयांवर आक्षेप नोंदवले गेले होते. तसेच उच्च क्षमतेच्या उपकरणांच्या अनावश्यक खरेदीसाठी काही कंपन्यांना टेंडर देण्यात आल्याचे आरोपही त्यांच्यावर झाले होते.

युनूस सरकारमधील पर्यावरण मंत्री सैयदा रिजवाना यांनी स्पष्ट केले की, फैज आपल्या कुटुंबासह नेदरलँड्समध्येच वास्तव्यास असून युनूस सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी ते काही काळ बांग्लादेशात परतले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top