Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Immediate action : महिलांच्या तक्रारीवर तात्काळ निर्णय; प्रभाग ८ मधील पाईपलाईन लिकेज अखेर दूर

Immediate action : शहरातील मूलभूत नागरी सुविधांबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यासह नगरसेवकांनी पुन्हा एकदा आपली तत्पर आणि निर्णयक्षम कार्यशैली दाखवून दिली आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील एमएसईबी कार्यालयाच्या मागील गल्लीत पाईपलाईनला मोठे लिकेज होऊन नागरिकांना नळावाटे नालीतील घाण पाणी मिळत असल्याची गंभीर तक्रार उध्दव सेनेच्या नगरसेवकांकडे आली होती. या प्रश्नाकडे नगरसेवक नितीन तुपे, अमर घोडे यांनी तात्काळ लक्ष देत संबंधित यंत्रणेला त्वरित लिकेज काढण्याची सुचना केली.

Immediate action

नगराध्यक्ष किशोर गारोळें यांच्यासह नगरसेवकही ‘ॲक्शन मोड’मध्ये!

मेहकर : शहरातील मूलभूत नागरी सुविधांबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यासह नगरसेवकांनी पुन्हा एकदा आपली तत्पर आणि निर्णयक्षम कार्यशैली दाखवून दिली आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील एमएसईबी कार्यालयाच्या मागील गल्लीत पाईपलाईनला मोठे लिकेज होऊन नागरिकांना नळावाटे नालीतील घाण पाणी मिळत असल्याची गंभीर तक्रार उध्दव सेनेच्या नगरसेवकांकडे आली होती. या प्रश्नाकडे नगरसेवक नितीन तुपे, अमर घोडे यांनी तात्काळ लक्ष देत संबंधित यंत्रणेला त्वरित लिकेज काढण्याची सुचना केली.
या प्रभागातील महिलांनी थेट पालिकेकडे तक्रार केल्यानंतर नगर सेवकांनी केवळ सुचना देऊन थांबण्याऐवजी प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकारामुळे अवघ्या काही वेळात पाईपलाईनचे लिकेज दुरुस्त करण्यात आले असून, आता या भागात स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होणार आहे. नागरिकांना नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यासह त्यांच्या नगर सेवकांच्या तत्पर सेवेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर किशोर गारोळे यांनी विकासकामांना गती दिली असून, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अतिक्रमणाचा जटिल प्रश्न मार्गी लावत अतिक्रमकांना घरकुल मिळण्याचा मार्ग त्यांनी खुला केला आहे. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरही त्यांनी सकारात्मक तोडगा काढत प्रशासनात शिस्त आणली आहे.
प्रभाग क्रमांक ८ लिकेज काढण्यासाठी नगराध्यक्ष गारोळे यांच्या मार्गदर्शना नगरसेवक नितीन तुपे, अमर घोडे यांनी पुढाकार घेतला.त्यामुळे, या भागातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top