Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Illicit liquor manufacturing :बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illicit liquor manufacturing :३१ डिसेंबर (थर्टी फर्स्ट) व नववर्ष स्वागत तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य व्यवसायावर मोठी कारवाई करत अकोला विभागातील बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या धडक कारवाईत एकूण ३२ लाख ३४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई अकोला विभागातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

Illicit liquor

राज्य उत्पादन शुल्क, अकोला विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई

 

राहुल सोनोने

दिग्रस बु. : ३१ डिसेंबर (थर्टी फर्स्ट) व नववर्ष स्वागत तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य व्यवसायावर मोठी कारवाई करत अकोला विभागातील बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या धडक कारवाईत एकूण ३२ लाख ३४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई अकोला विभागातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

डॉ. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य (मुंबई) यांनी १३ व २० डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या आदेशानुसार तसेच प्रसाद सुर्वे, सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता), डॉ. पराग नवलकर, विभागीय उप-आयुक्त, अमरावती विभाग यांच्या निर्देशानुसार आणि सीमा झावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शेतशिवारात सुरू होता बनावट दारूचा कारखाना

दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क, अकोला विभागाने मौजे चिंचखेड, ता. पातूर, जि. अकोला येथील शेतशिवारात असलेल्या एका अस्थायी शेडवर छापा टाकला. येथे टँगो पंच व रॉकेट देशी दारू संत्रा या ब्रँडच्या ९० मिली क्षमतेच्या ३५० बॉक्समधील एकूण ३५ हजार प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या, मद्यार्क वासाचे २०० लिटर क्षमतेचे ३५ प्लास्टिक ड्रम, एक मोटारसायकल व ट्रॉलीसह ट्रॅक्टर असा २० लाख ३२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी सुभाष गावंडे, जवान यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास महेंद्र सोनार, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला क्र. ०१ हे करत आहेत.

पोल्ट्री फार्ममधूनही मोठा साठा जप्त

याच कारवाईदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजे चिंचखेड येथील किसान पोल्ट्री फार्म येथील कुलूपबंद खोलीवर दारूबंदी कायद्यान्वये छापा टाकण्यात आला. येथे अवैध विक्रीसाठी लपवून ठेवलेली रॉकेट देशी दारू संत्रा या ब्रँडची ९० मिली क्षमतेची ३०० बॉक्समधील एकूण ३० हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत १२ लाख १ हजार ५०० रुपये आहे.या प्रकरणी आकाश बर्डे, जवान यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास भरतकुमार धुरट, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, अकोला हे करत आहेत.

संशयित आरोपी फरार

दोन्ही कारवाईदरम्यान घटनास्थळी असलेले संशयित आरोपी जंगलमय भागाचा फायदा घेत पलायन करण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध सुरू असून, संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ)(ई), ८१, ८३ व ९० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, घटनास्थळाच्या जमिनीच्या मालकीबाबत माहिती मिळविण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी तसेच जप्त वाहनांच्या मालकीबाबत तपासासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व जवान

या धडक कारवाईत प्रमोद कांबळे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, अकोला यांच्यासह जवान विशाल बांबलकर, सुभाष गावंडे, योगेश सरप, रमाकांत मुंढे, आकाश बर्डे, जयंत शेगोकार तसेच वाहनचालक नरेश कास्देकर, प्रविण गजभार, राजेश खिराळे आणि महिला जवान गीता भास्कर व वैष्णवी बोडखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top